खोट्या सुखाच्या संसारी
दिस गेला बुडायला
झुले आठवांचा झुला
आस झाली पल्लवीत
पडे भुरळ मनाला
झाली गडद सावली
सांजवेळ ओशाळली
माझ्या रित्या काळजात
तुझी आरास मांडली
तेल वात करताना
मन काबूत राहिना
माझ्या स्वपाळू डोळ्यात
पूर आला आसवाना
तुला वाहिलेले फुल
त्याचे निर्माल्य जाहले
ध्यान मग्न होता होता
आराध्यच बदलले
ज्योत जळे देवापुढे
तेज अंतरात चढे
मन आठव गाण्यात
होते आभाळा येवढे
कशी करावी साधना
माझे मलाही कळेना
देव हरवला माझा
तोच मला सापडेना
झाले समरस तरी
होते कावरी बावरी
मन मोडून नांदते
खोट्या सुखाच्या संसारी
दिस गेला बुडायला
झुले आठवांचा झुला
आस झाली पल्लवीत
पडे भुरळ मनाला
झाली गडद सावली
सांजवेळ ओशाळली
माझ्या रित्या काळजात
तुझी आरास मांडली
तेल वात करताना
मन काबूत राहिना
माझ्या स्वपाळू डोळ्यात
पूर आला आसवाना
तुला वाहिलेले फुल
त्याचे निर्माल्य जाहले
ध्यान मग्न होता होता
आराध्यच बदलले
ज्योत जळे देवापुढे
तेज अंतरात चढे
मन आठव गाण्यात
होते आभाळा येवढे
कशी करावी साधना
माझे मलाही कळेना
देव हरवला माझा
तोच मला सापडेना
झाले समरस तरी
होते कावरी बावरी
मन मोडून नांदते
खोट्या सुखाच्या संसारी
तुकाराम पाटील
पिंपरी पुणे१७