झरीत जिल्हा दारूबंदीसाठी स्वामिनीचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा.



रफीक कनोजे झरी : 28 एप्रील 2015 ला स्वामिनीचा पहिला मोर्चा घाटंजी येथुन महेश पवार यांचे नेतृत्वात निघाला होता. त्यानंतर अधिवेशनावर कित्येकदा आंदोलन व मोर्चे काढण्यात आले. इतकेच नव्हे तर पदयात्रा सुध्दा काढण्यात आल्या होत्या. 20 डिसेंबर २०१७ ला नागपूर अधीवेशनाच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचेसोबत चर्चा सुध्दा झाली. परंतू मुख्यमंत्री फडणविसांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता केली नाही. गेल्या चार वर्षापासून जिल्ह्यात स्वामिनी जिल्हा दारूमुक्ती आंदोलन राबवित आहे. मात्र अद्याप यवतमाळ जिल्हा दारूबंदी झाला नसल्याने पुन्हा स्वामीनीने जिल्हा दारूबंदी साठी आंदोलन छेडले आहे.झरी तालुका आदिवासी बहूल आहे. येथे श्रमिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दिवसभर काबाडकष्ट करून कमावलेला पैसा दारूमध्ये जातांना दिसतो आहे. कित्येक कुटूंब या दारूमुळे उघड्यावर आलेले आहे. परंतू या दारूमुळे शासनाच्या तिजोरीत दिवसेंदिवस भरच पडत आहे. श्रमिकांची होणारी लूट थांबविण्यासाठी स्वामीनी जिल्हा दारूबंदी संघटना पुन्हा सरसावली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळख आहे. परिणामी कित्येक शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. यात कित्येक शेतक-यांची कुटूंबे उघड्यावर पडली आहेत. जर दारूमुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण कमी होत असेल तर या जिल्ह्यातील शेतकऱ्याना वाचविण्यासाठी दारूबंदी आणण्यास हरकत नाही असा सवाल आंदोलकांनी केला आहे.परिणामी स्वामिनीने पुन्हा एकदा एल्गार पुकारत संपूर्ण जिल्ह्यात धरणे आंदोलन छेडले आहे. झरीतील तहसिल परिसरात सुध्दा पाटणचे झरी तालुका दारुबंदी संघटक राम आईटवार, यांचे मार्गदर्शनाखाली
मंथना लोडे, निर्मला दातारकार, पार्वता चौधरी, सवीता मडावी,  पार्वता ठावरी, गोपीका मलवडे, लक्ष्मी  एंबडवार, सवीता डाहुले, मंजुषा चिंचुलकर, वनीता दातारकर, सविता चीने, अनीता एंबडवार, नलुबाई हिवरकर, उज्वला कातारकर, पुष्पा मासीरकर आणी विविध संघटनांच्या पदाधिका-यांनी आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवित नायब तहसीलदार विजय मत्ते  यांना निवेदन सादर केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post