इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील लोकवचनालयात येथील व्यंगचित्रकार गणेश हिप्परगेकर(कुलकर्णी) यांनी दि.3 एप्रिल रोजी व्यंगचित्र प्रदर्शन भरविला होता.या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उदघाटन नगराध्यक्षा पोर्णीमा जगदिश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख म्हणुन नगरस्वक श्रीनिवास माळी,माजी पं.स.सदस्य इंद्रजित लोमटे,तलाठी जगदिश लांडगे,युवक कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे,भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,सहदेव काडगावे,प्रकाश तोडकरी,विरेश स्वामी,डॉ.
हेमंत श्रीगीरे,शशांक पाटील,विजय महानुर,अनिल येल्लुरे,राम हिप्परगेकर(कुलकर्णी),सुलचना रसाळ, श्रीशैल जट्टे,ग्रंथपाल संजय जेवळीकर,अदि उपस्थित होते.
या व्यंगचित्र प्रदर्शनात एकून 90 व्यंगचित्र प्रदर्शनात मांडण्यात आली होती.यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रश्न,लोहारा येथील समस्या,वर्तमान राजकारणांवर भाष्य करणारी,मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या आणि महाराष्ट्र व देशभरातील बदलत्या राजकीय-सामाजिक घडामोडी दर्शविणारी मराठी भाषा,समाज आणि संस्कृतीसमोरील प्रश्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकत्रितपणे पहिल्यांदाच व्यंगचित्र प्रदर्शनात मांडण्यात आली होती.सामान्य माणसाच्या समस्येला वाचा फोडणारे विषय या निमित्ताने प्रेक्षकांना पहायला मिळाले.या प्रदर्शनाच्या माध्यमातुन गणेश हिप्परगेकर यांनी समाजातील विविध प्रश्नांची मांडणी केली होती.हे प्रदर्शन पहाण्यासाठी शहरातील विद्यार्थी,विद्यार्थिनी,महिला व नागरीक यांनी मोठी गर्दि केली होती.

