उमरगा तालुका प्रतिनिधी चेतन पवार
उन्हाळ्यात शालेय विद्यार्थांचे तहान मिटणार.जि प प्रशाला आलूर येथील शाळेतील हातपंपाचे पाणी गेल्या महिन्यापासून गेले असून, शाळेतील विद्यार्थ्याना पिण्याच्या पाण्याची नाहक त्रास होत असताना, जनहित सामाजिक संस्था, आलूरनी पुढाकार घेऊन शाळेतील विद्यार्थ्याना दररारोज थंड पाण्याच्या जारची व्यवस्था करून लोकांसमोर एक आदर्श निर्माण केले आहे.याबद्दल सविस्तर माहिती अशी कि, गावापासून 2 किमी अंतरावर असलेल्या जि प प्रशालेच्या हातपंपाचे पाणी गेल्या महिनाभरापासून गेले आहे. विद्यार्थी व शिक्षक यांना पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात त्रास होत आहे. उन्हाळा व त्यात उष्णतेची लाट संपूर्ण महाराष्ट्रात पसरले असताना विद्यार्थ्याना पिण्याचे पाणी मिळत नाही, जर गावात शाळा असले तर एवढा त्रास सहन करावे लागले नसते, पण गावापासून 2 किमी लांब असणाऱ्या शाळेत विद्यार्थ्याना पाण्याची सोय करण्यासाठी गावातील जनहित सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन शाळेतील विद्यार्थ्याना व शिक्षकांना सुट्ट्या पडेपर्यंत थंड पिण्याच्या पाण्याची सोय केले. शालेय समितीचे अध्यक्ष हणमंत कोगनुरे व सदस्य, मुख्याध्यापक कुलकर्णी डि एस आणि शिक्षकवृंद यांनी जनहित सामाजिक संस्थेचे आभार मानले. विद्यार्थ्याना पाण्यासाठी यापुढे भटकंती करावे लागूच नये यासाठी सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व गावातील शाळेचे माजी विध्यार्थी, गावकरी यांनी पुढाकार घ्यावे असे आवाहन जनहित सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अॅड. शिवराज कुंचगे यांनी केले आहे....
शालेय समितीचे अध्यक्ष हणमंत कोगनुरे, बसप्पा मासूडे, अमृत गुरव, शिक्षक व विद्यार्थी..
