तेल्हारा येथेश्री रामनवमी उत्सव शोभायात्रा समिती कार्यालयाचे थाटात उदघाटन


 प्रवीण वैष्णव
तेल्हारा प्रतिनिधी/  :-तेल्हारा येथे श्री रामनवमी उत्सव शोभायात्रा समिती च्या वतीने कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले .
दि १०मार्च रोजी श्री रामनवमी उत्सव शोभायात्रा समिती च्या वतीने कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले यावेळी सर्व प्रथम प्रभू श्री रामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .त्या नंतर श्री रामनवमी उत्सव शोभायात्रा समिती चे माजी अध्यक्ष विक्की भाऊ मल्ल तसेच विद्यमान अध्यक्ष विवेक खारोडे उपाध्यक्ष अंकुश सपकाळ सचिव संतोष राठी यांचे हस्ते कार्यालयाचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजी करून फित कापून उदघाटन करण्यात आले.गेल्या ६ वर्षापासून तेल्हारा शहरात सर्व पक्ष विविध संघटना तसेच सार्वजनिक मंडळे व शहरातील सर्व श्रीराम भक्त मोठ्या संख्येने सहभाग घेतात .दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सर्वांच्या सहभागाने रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले .येत्या २५ मार्च रोजी भव्य शोभायात्रा चे आयोजन करण्यात आलेले आहे .तसेच यादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .यावेळी तेल्हारा शहर व पंचक्रोशीतील सर्व श्री रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे समिती च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post