काॅग्रेस -राष्ट्रवादी ने मुस्लीम समाजाची दिशाभुल केली— जमालभाई सिद्दीकी


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी:-  काॅग्रेस व राष्ट्रवादी ने देशभरातील मुस्लीमांना भारतीय जनता पार्टीची भिती दाखवून मुस्लीम समाज व भाजपमध्ये दरी निर्माण करण्याचे काम केले.अनेक योजनांपासुन मुस्लीमांना मुख्य प्रवाहात अद्यापर्यंत येऊ दिलेले नाही.या पुढच्या काळात देशाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची प्रगती होत अाहे असे  प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष जमालभाई सिद्दीकी यांनी केले.  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवनीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने अल्पसंख्याक समाजाची जनजागृती करण्यासाठी संपुर्ण राज्यात संवाद यात्रा काढण्यात अाली आहे.हि संवाद यात्रेच्या माध्यमातुन प्रत्येक गावात व शहरात जावुन अल्पसंख्याक समाजाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे


.हि संवाद यात्रा उस्माना तालुक्यातील बेंबळी,रुईभर पाटी,उस्मानाबाद शहरात दि.10 मार्च रोजी आगमन  झाली.या प्रसंगी ते बोलत होते.या संवाद यात्रेचा कार्यक्रम दि.10 मार्च रोजी सांयकाळी उस्मानाबाद येथील जत्रा हॉटेलमध्ये घेण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी होते.यावेळी मान्यवरांचा सत्कार भाजप जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी,भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सह साखर कारखान्याचे तज्ञ संचालक तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष रामदास कोळगे,
अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा अध्यक्ष अतिक पटेल,उस्मानाबाग भाजप तालुका अध्यक्ष दत्तात्रय सोनटक्के व बेंबळी ग्रामपंचायत व बेंबळी एस.एम.पी.सेवा सहकारी सोसायटी यांच्यावतीने मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख म्हणुन अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सरचिटणीस एजाज देशमुख,जिल्हा प्रभारी फादर इंगलस,भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे,भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड.नितीन भोसले,भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड.अनिल काळे,भाजप अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा अध्यक्ष अतिक पटेल,भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष वाजिद शेख,अदि उपस्थित होते


 यावेळी जमालभाई सिद्दीकी पुढे बोलताना म्हणाले कि,मुस्लीम समाजाने या पुढच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे यावेळी सांगीतले.यावेळी अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सरचिटणी एजाज देशमुख,भाजप जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी,भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष रामदास कोळगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक हाजी बाबा शेख व सुत्रसंचालन जुबेर शेख यांनी केले.तर आभार अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अतिक पटेल यांनी मानले.या कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष रामदास कोळगे,हाफिज अलीमोद्दीन,अल्पसंख्या शहराध्यक्ष मुसा औटी(उमरगा),बाबा शेख,जुनेद शेरीकर,भाजप मिडिया सेल तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला(लोहारा),अँड.
फेरोज शेख,वसिम मनियार,भाजप तालुका अध्यक्ष दत्तात्रय सोनटक्के(उस्मानाबाद),सरपंच दत्ता कस्पटे
(रुईभर),राजा भाणगे,बालाजी भोयटे,किशोर कोळगे,
बालाजी कोळगे,अमरसिंह कोळगे,गणेश कोळगे,शेख गुरुजी,विष्णु डोलारे,नितीन शिंपले,भरत कस्पटे,
हरीचाचा गव्हाणे,धर्मराज घोडके,सरपंच अर्चनाताई माने(बेंबळी),बाळासाहेब माने,नवाब पठाण,चेअरमन सोमनाथ गवळी,हाजी मैनुद्दीन शेख,यांच्यासह अल्पसंख्याक समातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post