नीलेश सुखसोहले
अकोला, दि. 10 – मागील महिन्याच्या 13 तारखेपासून लोकसहभागातून सुरु झालेल्या मोर्णा स्वच्छता मोहिमेला नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून गुलजार पु-यातील नागरीकासह अकोलेकरांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. या मोहिमेत आज जाणता राजाचे कलाकार तसेच कुटे कोचिंग क्लासेसचे संतोष कुटे सह त्यांचे विदयार्थी यांनी एकत्र येऊन दगडी पुलाच्या जवळील गुलजार पुरा परिसरातील मोर्णाच्या काठावर स्वच्छता केली.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सक्रीय सहभाग घेऊन मोर्णा नदीतील जलकुंभी बाहेर काढली. यावेळी त्यांना जाणता राजाचे कलाकार तसेच जय गजानन मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश अभ्यंकरसह त्यांचे मित्र , संतोष कुटे कोचिंग क्लासेसचे विदयार्थी , सामाजिक संस्थाचे कार्यकर्ते, गुलजार पु-यातील रहिवासी पत्रकार संघाचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मासह त्यांच्या कुटूंबातील महिला व मुलांसह 16 सदस्य ,महसुल व मनपा कर्मचारी व अधिका-यांसह नदीकाठच्या नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद स्वच्छता मोहिमेला लाभला. आजच्या मोहिमेत गुलजार पु-यातील नागरीक महिला व मुलांसह सहभागी झाले होते. हे या मोहिमेचे वैशिष्टय आहे.
नागरीकांसोबतच पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, महापौर विजय अग्रवाल , माजी नगराध्यक्ष हरिश अलिमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे , तहसिलदार राजेश्वर हांडे, तहसिलदार रामेश्वर पुरी ,नगरसेवक अजय रामटेके, नगरसेवक शशी चोपडे,नगरसेविका उषा विरक ,नायब तहसिलदार राजेद्र इंगळे, मनपाचे कैलास पुंडे, ओंकारेश्वर शिव भक्त मंडळाचे कार्यकर्ते , पराग गवई मित्र परिवार यांच्यासह विविध सामाजिक संस्था ,महसुल व मनपा कर्मचारी व अधिका-यांचा प्रचंड प्रतिसाद स्वच्छता मोहिमेला लाभला आहे.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नातून अकोल्याचे वैभव असणाऱ्या मोर्णा नदीची लोकसहभागातून झपाटयाने स्वच्छता होत आहे. मोर्णा स्वच्छता मिशनच्या आजच्या नवव्या टप्प्याच्या मोहिमेसाठी त्यांनी नागरीकांना मोर्णा स्वच्छतेसाठी आवाहन केले होते, या आवाहनाला तितकाच भरभरुन प्रतिसाद देत मोर्णा काठी आज हजारो नागरीकांनी एकत्र येऊन मोर्णाची स्वच्छता केली. ही अकोलेकरांसाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, मोर्णा नदीच्या 8 किलोमीटर क्षेत्रातील 6 किलोमीटरचे काम जवळजवळ पुर्ण झाले आहे. मार्च व एप्रिल महिन्यात राहिलेल्या 2 किलोमीटरचे काम करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेसाठी मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील जलस्तोत्रांच्या स्वच्छता व सौदर्यीकरणासाठी 27 कोटी रूपयाची तरतुद करण्यात आली आहे. ही अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. असे सांगून अकोलेकरांच्या वतीने मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे त्यांनी आभार मानले.
दरम्यान आज सकाळी ठिक 8.00 वाजल्यापासून दगडी पुलाच्या जवळील गुलजार पुरा परिसरातील मोर्णाच्या काठावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी जेसीबीव्दारे काढण्यात आलेली जलकुंभी तसेच प्लॅस्टिकचा कचरा नागरीकांनी नदीच्या काठावर जमा केला .
आयुवैदिक महाविदयालयाचे तसेच गव्यंम सोशल वेलफेअर सोसायटीचे डॉ.कृष्णमुरारी शर्मा यांनी स्वच्छता मोहिमेत किरकोळ जखमी झालेल्या 5 व्यक्तींवर प्रथमोपचार करुन त्यांना धर्नुवाताचे इंजेक्शन दिले. मागील 13 जानेवारी पासून डॉ. शर्मा सतत मोहिमेत भाग घेत असून जखमीवर उपचार करत आहेत.
या मोहिमेत राष्ट्रीय चर्मकार संघ शाखा अकोला ,भावसार महिला मंडळ जुने शहर, लघुव्यवसायी व्यापारी संघटना, सेवा फाउंडेशन , क्रिडा भारती, नॅशनल मोबाईल मेडिकल युनिट ,विदर्भ पटवारी संघटना ,निमाचे डॉ. मिलींद बडगुजर, डॉ. वर्षा बडगुजर, डॉ. गुप्ता, डॉ.चर्तुवेदी, गव्यम सोशल वेलफेअर सोसायटी यांच्यासह व्यापारी, बचतगटाच्या महिला, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी/कर्मचारी, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत, वयोवृध्द नागरिक, विदयार्थी आणि सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले होते. केवळ अकोला शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातून अनेकजण स्वच्छतेसाठी पुढे येवून आपला सक्रीय सहभाग नोंदविला. श्रमदान करणा-या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे श्री. नाईक , निलेश मगर यांचे सक्रीय योगदान लाभले.
तसेच सानिया मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या रिना धोटे, आयुवेर्दिक रूग्णालय अकोला, वेदाश्रय फिल्म्स, गरुदेव मॉर्निग क्लब, निर्भय बनो जनआंदोलनचे कार्यकर्ते दिपशीला महिला वस्तीस्तर संघ, मनपाचे आरोग्य निरिक्षक, झोन अधिकारी , महाराष्ट राज्य शहर व ग्रामीण पत्रकार संघाचे संजय देशमुख ,जमानाचे संपादक शाम शर्मा, पत्रकार विनोद गुप्ता तसेच उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या पत्नी निता खडसे ,मुलगी साना , दिपाली बेलखेडे यांनी मोर्णा स्वच्छतेमध्ये सहभागी होवून श्रमदान केले.
नदीच्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छते अंतर्गत करावयाच्या बाबींचे परिपूर्ण नियोजन जिल्हा प्रशासन आणि मनपा व पोलीस प्रशासनाने केले होते. त्यामुळे सहभागी सर्वांनीच कुठलीही भीती न बाळगता स्वयंस्फुर्तीने नदी काठावरील कचरा हिरीरीने ट्रॅक्टर व घंटागाडीत टाकला. मोर्णा स्वच्छ झालीच पाहिजे या भावनेतून सर्वजण मन लावून काम करताना दिसत होते. विशेष म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार किंवा दुर्घटना न घडता ही मोहिम खूपच शिस्तबध्दपणे व शांततेने पार पडली.
- जिल्हाधिकारीसह जाणता राजाचे कलाकारांनी केली मोर्णाची स्वच्छता
- गुलजारपु-यातील नागरीकासह कुटे कोचिंग क्लासचे विदयार्थी सहभागी
- पालकमंत्री ,महापौरसह लोकप्रतिनिधी ,नगरसेवक ,महसुल व मनपा कर्मचा-यांचा सहभाग
- दगडी पुलाजवळील गुलजारपुरा परिसरातील मोर्णाच्या काठावर केली स्वच्छता
- दर शनिवारी केली जाणार मोर्णाची स्वच्छता
- अत्यंत शांततेत व शिस्तीत पार पाडली मोहिम
- डॉ. कृष्णमुरारी शर्मा यांनी केले जखमीवर उपचार