इकबाल मुल्ला
लोहारा:- तालुक्यातील नागुर येथील भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्था लोहारा चे संस्थापक अध्यक्ष अँड. सुरेश शंकरराव जावळे पाटील (वय 65 वर्षे) यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दि.9 मार्च रोजी सकाळी 10:35 वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्च्यात पत्नी,2 मुले,2 मुली,9 भाऊ,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते लोहारा कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती तथा विद्यमान संचालक दिनकरराव जावळे-पाटील यांचे मोठेे बंधू होते.यांच्या अंत्यविधीस सामाजिक व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
