जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत धरणे आंदोलन,स्वाक्षरी निवेदन संपन्न



मंगळवार ता २७ मार्च यवतमाळ (प्रतिनिधि मक़सूद अली)
आज दिनांक २७/०३/२०१८ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग २००५ नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सरसकट सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करण्या बाबत ,सातवा वेतन आयोग लागू करणे, कंत्राटी पद्धतीने भरती बंद करा,कर्मचारी कपात बंद करा ,महिला बाल संगोपन रजा मंजूर करा,या व इतर कर्मचारी मागण्या संदर्भात तिरंगा चौक यवतमाळ येथे दुपारी दोन ते तीन वाजता  एक दिवसीय धरणे आंदोलन स्वाक्षरी आंदोलन राज्य सरकारी कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना ,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ,वसंतराव नाईक शासकीय वेद्यकिय महाविद्यालय, पाटबंधारे विभाग,शासकीय तंत्रनिकेतन, वनविभाग,शिक्षण विभाग,मेल नर्सेस ब्रदर संघटना व इतर सर्व कर्मचारी संघटना तर्फे आंदोलन  करण्यात आले


कमचार्यानी एकत्र येऊन प्रचंड मोठी घोषणाबाजी केली
 सर्व कर्मचाऱ्यांच्या सहयांचे निवेदन मा.उपजिल्हाधिकारी श्री जाजू साहेब यांना शिष्टमंडळ तर्फे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांचे मार्फत हे सहयाचे निवेदन मा .प्रधानमंत्री  याना पाठविण्यात येणार आहे  जिल्ह्यातील सर्व कर्मचारी हजारोच्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post