प्रकाश श्रीवास
मूर्तीजापुर दि.२९ ( तालुका प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्ग क्र सहा वरील नवसाळ शेतशिवारात अकोल्यावरून अमरावती कडे जात असलेल्या मारोती सुझुकी स्विफ्ट कारने कुरूम चिचखेड वरून मूर्तीजापुर कडे येणाऱ्या फँशन प्रो.या दुचाकीस जबर धडक दिल्याने २ जण गंभीर जखमी झाले आहेत. माना पोलीस स्टेशन सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार दि.२९ मार्च रोजी दुपारी १२:४५ वाजताचे दरम्यान अकोल्यावरून अमरावती कडे भरधाव वेगाने जात असलेली मारोती सुझुकी स्विफ्ट कार क्रमांक एम.एच.३०/ पी/ 4644 ने कूरूम चिचखेड वरून मूर्तीजापुर कडे येत असलेल्या फँशन प्रो. दुचाकी क्रमांक एम.एच.३७/ पी/ ७९६५ ला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील अरविंद मल्लु चव्हाण वय( २५), राजकुमार जवाहरलाल राठोड वय( २२) रा. धोत्रा जहाँगीर ता. कारंजा लाड जि. वाशीम हे गंभीर रित्या जखमी होवुन फेकल्या गेले. त्यांना उचलून दवाखान्यात नेणारा कोणीच तयार नव्हता एवढयात त्याच मार्गाने फाँरचुनर गाडीने अमरावती कडे जात असलेले मूर्तीजापुर येथील समाजसेवक गूलाबचंद जगनारायण दुबे यांनी गंभीर जखमीना पाहताच आपली फाँरचुनर कार थांबवून जखमीना त्यांचेच गाडीत बसवून मूर्तीजापुर येथील श्रीमती लदेसा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. दुचाकी वरील एकाचे तोंडावर गंभीर मार आहे. तर दुसऱ्या ला कमी प्रमाणात मार लागला आहे. दैव बलवत्तर म्हणून गुलाबचंद दुबे त्याच मार्गाने अमरावती कडे जात असतांना त्यांना हा अपघात दिसल्यामुळे दोघांचे प्राण वाचले आणी त्यांना वेळीच उपचार मिळाले. दोन्ही जखमीवर प्रथमोपचार करून त्यांना अकोला येथे पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती माना पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांना अपघाताचे काही वेळापुर्ववीच मिळाली होती मात्र माना रेल्वे स्टेशन वरील गेट नादुरुस्त असल्यामुळे ते वेळेवर पोहोचु शकले नाही. रेल्वे च्या दिरंगाईमुळे त्यांना नाहक त्रास सहन करून दुसऱ्या मार्गाने दुचाकीवरून घटनास्थळी पोहचावे लागले.याप्रकरणी त्यांनी अपघात घडवून आणणारी मारोती सुझुकी स्विफ्ट कार पोलीस ठाण्यात जमा केली आहे. मात्र याप्रकरणी फिर्यादी ची तक्रार न आल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पुढील तपास माना पोलीस स्टेशन चे ठाणेदार भाऊराव घुगे करीत आहे.
