जितापुर खेडकर येथे श्रमदानातून श्री संत गजानन महाराज मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर


अतुल नवघरे
लाखपुरी:-४, येथून जवळच असलेल्या जितापुर खेडकर येथे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून गावामध्ये सुरू असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिराचे बांधकाम सुरू आहे.  या बांधकामासाठी गावातील  सर्व जेष्ठ नागरिक, तरूण उत्साही युवक मंडळी प्रामुख्याने उपस्थित    होते. बांधकाम सुरू असताना अपु-या देणगी मुळे मंदिराचे बरेचसे बांधकाम थांबलेले आहे तरी श्रध्दावान भक्तांना सढळ हाताने मदतीचे आवाहन बांधकाम समितीच्या वतीने करण्यात यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रकाश पाटील खेडकर, मधुकर ठाकरे,विलास खेडकर,गजानन नाकट ,रविंद्र निकम,नंदु खेडकर, शुभम ना कट ,साहेबराव गांजरे,विठ्ठल ना कट, बबलु निकम,नैनेश चव्हाळे,उल्हास नाकट,उमेश खेडकर,  दिनेश डोळे, जनार्दन नाकट,चेतन नाकट,ऋषिकेश नाकट,शहादेवराव खेडकर ,अजय शेंडे,गजानन नाकट,सुनिल उमाळे ,प्रमोद उमाळे,तसेच  गावचे  सरपंच जिवन ढोकणे  इत्यादी नागरीक प्रामुख्याने उपस्थित होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post