चंद्रपुर (प्रतिनिधि): 'धर्मराज्य'च्या वतीने तुकुम येथील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात 'धर्मराज्य'चे चंद्रपुर जिल्हा समन्वयक श्री. प्रदीप उमरे यांचे अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी 'धर्मराज्य महिला संघटने'च्या संयोजिका सौ. छाया उघडे, सौ. सरीता टिपले, लता मडावी, भानुमती मंडल यांची प्रमुख उपस्थीती होती.
यावेळी 'धर्मराज्य'चे चंद्रपुर जिल्हा समन्वयक प्रदीप उमरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदीप उमरे म्हणाले की, शिव छत्रपती हे खऱ्या अर्थाने जाणता राजा आहे. त्यांनी ज्या अनेक ऐतिहासिक व क्रांतिकारक जनहीताच्या गोष्टि केल्या त्यातली एक महत्वाची बाब म्हणजे, शिव छत्रपतीनी तत्कालीन मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यानंतर अशा तळमळीने मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी कुठल्याही राज्यकर्त्याने कधीच प्रयत्न केले नाहीत. म्हणून मराठी माणसांच्या चिमटीतुन निसटणारा महाराष्ट्र वाचविन्यासाठी मराठी भाषा वाचवा, वाढवा ! शिव छत्रपतीचा इतिहास हा येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे.
मराठी माणसांच्या हक्कासाठी शिव छत्रपतीचा आदर्श पुढे ठेऊन मराठी युवकांनी येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी तसेच 'धर्मराज्य'च्या कार्यकर्त्यानी सज्ज राहन्याचे आवाहन त्यांनी केले. शिवरायांचे नाव घेऊन राजकारणाला सुरुवात करणारे दिवसभरात औरंगजेबासारखे वागतात आणि आंबेडकरांनी घटना हाती सोपविली तेव्हा संघर्ष आंदोलनाची गरज नसल्याची अपेक्षा व्यक्त केली तरी राजकारन्यांनी सर्व सामन्यांच्या नशिबाला संघर्ष कायम ठेवला आहे. कार्यक्रमाला 'धर्मराज्य'चे हाजी सल्लाउद्दीन शेख, चेतन मडावी, संजय मासीरकर, संजय लोखंडे, सुनील आत्राम, रविकांत अनकर, सुरेंद्र नन्नावरे, सुनील काळे, संदीप ध्रूमकेतु, गजानन बुटके, रविंद्र नन्नावरे, माउली अंकुशे, चरणदास पोरटे आदींची उपस्थीती होती..!!

