(सैय्यद मुजीबोद्दीन)
पुसद- दिनांक ३० :- बंजारा समाजाला एस टि प्रवर्गा मध्ये समाविष्ट केल्या शिवाय प्रगती होऊ शकत नाही बंजारा समाज हा भारत देशात एकूण १९ राज्या मध्ये आहे आणि जास्तीत जास्त राज्या मध्ये एस टि प्रवर्गात आहे आणि आपल्या महाराष्ट्रात vjnt मध्ये म्हणून महाराष्ट्रातील बंजारा समाजाला सुद्धा एस टि प्रवर्गात समावेश करणे व वसंतराव नाईक विकास महामंडळ या महामंडळ वर सुध्दा बंजारा समाजा चा संचालक ठेवणे बंजारा समाजाला एस टि प्रवर्गात समाविष्ट करून लोकसंख्या नुसार राजकीय क्षेत्रात आरक्षणा ची आवश्यकता आहे।अशी मागणी अखिल भारतीय बंजारा युवा सेने चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष जिनकर राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृह पुसद येथील कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून केले।
कार्यक्रमाचे सुरुवातीस क्रांतिकारी सेवालाल महाराज व स्व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमची सुरुवात कऱण्यात आली।
अखिल भारतीय बंजारा युवा सेना या सामाजिक संघटनेचे विदर्भ प्रदेश कार्यकर्ता सत्कार व नियुक्ती कार्यक्रम विश्रामगृह पुसद येथे घेण्यात आले तसेच नवीन पदाधिकारी निवड करण्यात आली।यावेळी अखिल भारतीय बंजारा युवा सेना संपर्क प्रमुख संजय आडे व अखिल भारतीय बंजारा सेना मुंबई प्रदेश अध्यक्ष सुनील जाधव तसेच युवा सेना अमरावती विभाग प्रमुख जगजीत राठोड,सुनील राठोड नेर,यशराम जाधव हिवळणी आदी मान्यवरांचे भाषण झाले,
या कार्यक्रमास किरण राठोड दारव्हा,प्रतीक राठोड दिग्रस,गजानन राठोड हिवळणी,नवीन राठोड कातखेडा,अतिष राठोड जांब बाजार आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेश आडे,पंजाब राठोड,उमेश राठोड,निशांत राठोड,निलेश चव्हाण,अर्जुन जाधव,यशराम जाधव,मोतीराम चव्हाण,निरंजन राठोड,रवी चव्हाण,राजू जाधव,राजू आडे,अड. गौरव चव्हाण,अनिल राठोड,आकाश जाधव,पवन राठोड,युवराज जाधव,श्रीराम जाधव,राजेश राठोड,धर्मा राठोड,या नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन राठोड यांनी केले, कार्यक्रमाचे आयोजक संजय आडे पुसद तालुका अध्यक्ष होते तर आभार प्रदर्शन संजय राठोड महागाव तालुका अध्यक्ष यांनी केले।

