झोपड पट्टीतील नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर द्या




  • ·      से.ब. विद्यालय, नाथ नगर, जिजामाता नगर परिसरातील आरक्षण हटाव

  • ·      तेल्हारा शिवसेनेच्या वतीने नगर पालिकेला निवेदन


तेल्हारा : गेल्या अनेक वर्षांपासून इंदिरा आवास मधील झोपडपट्टी धारकांना त्यांची जागा त्यांच्या मालकीचे नसल्यामुळे त्यांना विविध शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागत आहे. से.ब.विद्यालया मागील, जिजामाता नगर, नाथ नगर परिसरातील आरक्षणाखाली असणाऱ्या नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याकरिता शिवसेना तेल्हाराच्या वतीने नगर परिषद तेल्हारा निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील इंदिरा आवास मधील झोपडपट्टी धारक नागरिक वास्तव्य करून राहत आहेत. शासनाने त्यांच्या आवास करिता जे बांधकाम करून दिले होते ते बांधकाम आज रोजी जीर्ण अवस्थेत झाल्याचे दिसून येत आहेत. अनेकांच्या घरावरील छत व आजूबाजूच्या भिंती नादुरस्त झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या राहण्याची गैरसोय होत आहे. त्यांची गैरसोय थांबविण्याकरिता न प ने त्यांची घरे दुरुस्ती करून इंदिरा आवास मधील झोपडपट्टी धारकांची न प तेल्हारा कार्यालयात भोगवटदार म्हणून नोंद आहे. टी काढून त्यांना त्यांच्या हक्काचे घर म्हणून टी जागा त्यांच्या नावावर कायम करून देण्यात यावी. तसेच घरकुल सारख्या इतर योजनांचा त्यांना लाभ मिळावा. तेल्हारा परिसरातील कित्येक भागात आरक्षणाचा विळखा पडलेला दिसून येत आहे.या मध्ये से ब विद्यालाया मागील व नाथ नगर, जिजामाता परिसर, हे आरक्षणाच्या विळख्यात असल्यामुळे तिथल्या नागरिकांना विविध सास्यांना तोंड द्यावे लागत आहे. तेल्हारा शहरातील जनतेच्या समस्या तेल्हारा न प ने लवकरात लवकर सोडवाव्या या करिता शिवसेना शहराच्या वतीने तेल्हारा नगर परिषद कार्यालय निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर समस्या शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख विक्रांत शिंदे, प्रसिद्धी प्रमुख प्रविण वैष्णव, माजी शहर प्रमुख पप्पू सोनटक्के, राजेश वानखडे, उप श प्र निलेश मुऱ्हेकर, मा उप श प्र सुधाकर गावंडे, अजय गावंडे, संतोष राठी, गजानन माझोडकर, विवेक खारोडे, संतोष साबळे, शाम राहटोळे, उमेश चौधरी, सचिन महल्ले, प्रफुल बोदडे, गणेश काकड, सचिन गावात्रे, श्रीकृष्ण अमृतकार, सोपान पांडे, सुरज काईगे, विलास भटकर, रहेमान शाह, मनीष गवळी, धनराज सोनोने, अजय खेळकर, सागर सोनटक्के, सागर भांगे, इत्यादींसह अनेक शिवसैनिक हजर होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post