सृजन साहित्य संघांची मासिक काव्यमैफल संपन्न



मूर्तिजापूर :- येथील सृजन साहित्य संघाची मासिक काव्यमैफल व सभा,प्रतिभावंत नगर मूर्तिजापूर येथील'हॅपी कीडस् स्कूल' येथे नुकतीच संपन्न झाली.या सभेच्या अध्यक्षस्थानी,महाराष्ट्र संगीत विदयालयाचे प्रमुख श्याम कोल्हाळे सर,तर प्रमुखअतिथी म्हणून डॉ. राहूल इंगळे हे होते.
         देवी सरस्वतीच्या प्रतिमा पूजनानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे व कविंचे स्वागत करण्यात आले.याप्रसंग्री विष्णु लोडम यांचा वाढदिवस असल्यामूळे व त्यांच्या आई नर्मदा लोडम यांच्या कार्यामूळे दोघांचा ही सत्कार करण्यात येऊन,त्यांच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या,साईराज मित्र मंडळानेही याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.
         यानंतर झालेल्या बहारदार काव्यमैफलीमध्ये सर्वश्री,ज्ञानदेव भड,रवींद्र जवादे, प्रा.प्रमोद राजंदेकर  , प्रमोद पंत,शैलेश गिरी,मिलींद इंगळे,विनोद महल्ले,बाळू बेलखेडे ,विष्णु लोडम,विलास वानखडे,डॉ. राहुल इंगळे, सुनिल ढोकणे,दिवाकर सोनोने,सौ. छाया चक्रनारायण ,सौ.सुनिता इंगळे हयांनी विविध विषयांवरील कविता सादर केल्या.
          श्री.श्याम कोल्हाळे सर यांनी अध्यक्षीय भाषणातून सृजन साहित्य संघाच्या साहित्यविषयक उपक्रमांचे कौतुक करुन,आपल्या सुरेल आवाजात सुरेश भट यांचे भावगीत सादर करुन उपस्थित रसिकांची मने जिंकली. सदर मैफलीचे सुत्रसंचालन विष्णु लोडम यांनी,तर आभारप्रदर्शन रवींद्र जवादे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सौ.पल्लवी मुळे मुअ,सौ.राखी चौबे सअ, सौ. अनघा धामोरे सअ,भटकर ताई सअ ,सौ.वर्षा लोडम, संचालिका,क्षमा इंगळे, विजयपोहनकर,नंदलाल डोंगरे व मित्रपरिवार हयांचे सहकार्य लाभले.              
       सदर मैफलीला परिसरातील श्रोत्यांची उपस्थिती लाभली होती.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post