- आकर्षक देखावे पाहण्यासाठी महीलांची अफाट गर्दी
मूर्तिजापुर :- मर्यादा पुरूषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्मोत्सव कार्यक्रम म्हणजेच श्रीरामनवमी यादिवशी प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव साजरा करून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मूर्तीजापुर शहरात दि.२५ मार्च रोजी भव्य आकर्षक देखाव्यासह शोभायात्रा काढण्यात आली. जय श्रीराम च्या जयघोषात निघालेल्या शोभायात्रेमूळे अख्यी नगरी राममय झाली होती.आकर्षक देखावे पाहण्यासाठी महीलांनी रस्तच्यादुर्तफा एकच गर्दी केली होती. मूर्तीजापुर येथील महाराष्ट्रीयन हिंदी भाषी बहुउदेशीय संस्था यांचे वतीने मागील अनेक वर्षांपासून मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम प्रभु यांचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्याक्रमासह व भव्य दिव्य शोभायात्रा काढुन साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे यंदा ही श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जुनी वस्ती परीसरातील रामपुराय येथील इतिहास कालीन श्रीराम मंदिर येथून संध्याकाळी ६:३० वाजता विविध प्रकारच्या आकर्षक देखाव्यासह बारा टँकटर मधून ढोलताशे, वारकरी
ः भजनमंडळ, स्वामी समर्थ पालखी, गजानन महाराज पालखी रथ,आतिषबाजी करून भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली.शोभायात्रेत आकर्षक देखावे पाहण्यासाठी शहरातील महीलांनी मार्गाचे दुतर्फा एकच गर्दी केली होती. शोभायात्रा रामपुरा येथून सुरुवात होवून पोळाचौक, परदेशीपुरा,बालाजी मंदीर,टांगा चौक, मेनरोड, मोरारजी चौक, भगतसिंग चौक, मार्ग शिवाजी चौक, मंगळवार बाजार, अग्रसेन चौक,जयस्त़ंभ चौक,सराफालाईन,ते स्टेशन विभागातील श्रीराम मंदिर येथे महाआरती करून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात महिलाची उपस्थिती होती. शोभायात्रा मार्गावर जय महाकाल, न्यु.अँडव्हेंचर, नगर पालिका, जय बजरंग मित्र मंडळ, गोंविद उधोग, व सामाजिक संस्थेकडून पिण्याचेपाणी,फराळ, चहा,आँईसक्रीम,शरबत, खिचडी, आदीची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी हर्षल साबळे व मित्र मंडळाच्या वतीने भव्य मोटरसायकल यात्रा काढण्यात आली. व जय बजरंग मित्र मंडळाच्या चे वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये ४० नवयुवकांनी रक्तदान केले.शोभायात्रेत प्रमोद वसंतराव हजारे यांचे मार्गदर्शनाखाली मिलष्ट्रीचे जवान आकर्षनाचे केंद्र ठरले होते. समीती अध्यक्ष तथा नगरसेवक दारकाप्रसाद दुबे यांचे नेतृवाखाली निघालेली शोभायात्रेत रामभक्ततांच्या गर्दीने गेल्या अनेक वर्षाचा उच्चांक गाठला. शोभायात्रा यशस्वीतेसाठी महाराष्ट्रीयन हिंदी भाषीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रतनलाल महाजन, माजी अध्यक्ष रमेशचंद्र कुर्मी, समीती अध्यक्ष दारकाप्रसाद दुबे, शालीकराम यादव, रमेश गुप्ता, संजय गुप्ता, संजय जयस्वाल, कैलाश महाजन,जगदीश कुंभेकर,ग्यानचंद महाजन, जवाहरलाल पातालबंसी,प्रशांत हजारी,ओमप्रकाश तिवारी, भुपेंद्र शुकला,आतिष महाजन,किशोर ठाकूर, संजय देवीकर,अमोल प्रजापती,सुरेश कनोजे, चंद्रकांत तिवारी, अभय पांडे, संजयसींह राजपूत, अँड. भारत जमादार, सुधीर दुबे, संतोष यादव,बंडु भगत,मुन्ना श्रीवास, मुन्ना गुप्ता, शिवकुमार दुबे, समाजसेवक गुलाबचंद दुबे, विशाल गुप्ता, अशोक दुबे, रमेश दुबे, बबलु यादव,मनोज बडोदे, आदी समाज बांधवांनी मोलाची कामगिरी बजावली.
