अतुल नवघरे
लाखपुरी : २५: मुर्तिजापुर तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल असलेले विदर्भातील काशी असलेल्या तिर्थ क्षेत्र लाखपुरी येथील श्री.मानिकराव चंद्रभानजी नवघरे यांची कन्या माला उर्फ लक्ष्मीमाता यांचा दि. २४-३-२०१८ ला दुपारी १ वा. त्यांचा छातीत दुखायला लागले असता त्यांना मुर्तिजापुर येथे अवघाते हॉस्पीटल मध्ये नेले असता डॉक्टारांनी त्यांना मृत घोषीत केले. माला उर्फ लक्ष्मीमाता यांचा अचानक झालेल्या निधनामुळे संपुर्ण लाखपुरी कारांनवर तसेच सर्व भावीभक्तांनवर दुखांचा जनु डोंगर कोसळला आहे.या आधी त्या दि. २३-३-२०१८ ला पुडलिंक महाराज यांच्या जन्म महोत्सवासतसेच संत मेलाव्यात पुडलिंक नगर येथे त्याचे वडिल गेले संत मेळव्याला गेले होते त्यांचा तो शेवटचा क्षण जणु काही पाहण्या जोका होता. त्यांची दि. २५-३-२०१८ ला वाजत गाजत टाळ ,मृदुग च्या गजरात शोभायात्रा काळण्यात आली होती. त्या शोभायात्रेत लाखपुरीकर , त्याचे नातलग , भावीभक्त , इत्यादी उपस्थीती होती .त्यांना समाधी देण्यात आली. त्यांचा जन्म ५/११/१९८२ साली झाला . त्या अवलाई होत्या. त्यांना गावातील तसेच आजुबाजुतील लोकांची त्यांच्या वर खुप मोठ्या प्रमाणात श्रध्दा होती. त्यांची शेगांव , पुडलिंक नंगर , वझेगांव ,कुंभारगांव ,इत्यादी ठिकाणी त्यांचा संत म्हणुन सत्कार करण्यात आला व भागवत कार्यामध्ये सुध्दा त्यांचा अनेक वेळा सत्कार झाला. माला उर्फे लक्ष्मीमाता यांची आई सौ. पुष्पा मानिकराव नवघरे व वडिल मानिकराव चंद्रभान नवघरे यांनी मुलीचा योग्य रितीने सांभाळ केला . माला उर्फ लक्ष्मीमाता हि लाखपुरी तसेच अनेक दुरदुरुन आलेल्या भाविभक्तांना त्यांच्या कडुन अनेक चमत्कार घडले व त्यां जनु भक्तांनवर छाप सोडुन गेल्या .
- लाखपुरी नगरीत उलटला जनसागर.
