प्रवीण वैष्णव
तेल्हारा :- शिवजयंती व तुकाराम बीज च्या निमित्ताने हिंदुसेनाप्रमुख धर्मवीर चंद्रशेखर गाडगिळ यांचे व्याख्यान गाडेगाव येथे दि.3 मार्च रोजी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आले आहे. युवाशक्ती संघटना व शिवसेना यांचा सयुक्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे हा कार्यक्रम गाडेगाव येथे मराठी शाळेचा मैदानावर आयोजित केलेले असून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे अनेक वर्षानंतर धर्मवीर चंद्रशेखर गाडगिळ यांचे विचार तेल्हारा परिसरातील जनतेस ऐकायला मिळणार आहेत गाडेगाव हे राजकीय सामाजिक चळवळीस अग्रेसर असून यापूर्वी येथे प्रमोदजी महाजन , मोहनजी भागवत, नितीनजी गडकरी त्यागिजी महाजन यांच्या सभा यापूर्वी झालेल्या आहेत.सुरवातीला चंद्रशेखर गाडगीळ हे तेल्हारा येथील दत्त मंदिरावर येथिल त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारर्पण होईल त्यानंतर शिवसेना जनसंपर्क कार्यालय लटियाल भवानी प्रतिष्ठान तेल्हारा येथे त्यांचा सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर गाडेगाव येथे त्यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम होईल. या समारोहास शिवसेना तालुका प्रमुख विजयभाऊ मोहोड, युवाशक्ती संघटनेचे संस्थापक भवानी प्रताप , पी पी ननावरे उपस्थित राहतील या सामारोहास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आहावान शिवसेना व युवाशक्ती संघटनेचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.
