ब्लाईंड सी स्पर्धेत अनिकेत भागवते प्रथम



मक़सूद अली
यवतमाळ :-  येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा संगणक विभागाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी अनिकेत नितीन भागवते याने  ब्लाईंड सी स्पर्धेत प्रथम क्रमां पटकविला. जगदंबा अभियांत्रीकी महाविद्यालय तर्फे आयोजित एक्सप्लोर 2018  या टेक्निकल इव्हेंट मध्ये त्याने हे यश प्राप्त केले.संगणकाची स्क्रीन बंद करुन वेळेवर दिलेला प्रोग्राम फक्त किबोर्ड वर बोटे चालवून वेळेत सॉल्व करायचा असतो. स्क्रिन वर काहीच दिसत नसल्यामुळे किबोर्ड वर चुकीचे बोट पडल्यास संपुर्ण प्रोग्रामच चुकत असतो.  विशेष म्हणजे अनिकेत ने या स्पर्धेत दुस-यांदा  प्रथम क्रमांक पटकविला आहे.या स्पर्धांमध्ये नांदेड, नागपूर, चंद्रपूर, अमरावती,अकोला यासह राज्यभरातील मोठया प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते. या यशस्वितेबद्दल त्याला जगदंबा अभियांत्रीकी महाविद्यालयात मोबाईल,मोमेंटो तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या व्यतिरीक्त अनिकेत भागवते तसेच अनुज दाते यांनी पेपर प्रेझेंटेशन मध्ये  व्दितीय क्रमांक पटकविला.या दोघांनी क्लाऊड कम्प्युटींग या विषयावर पेपर प्रेझेंटेशन केले त्यांना प्रा. यु. ए. बागडे तसेच प्रा. अतुल बोंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post