इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील माळेगाव येथील जि.प प्राथमिक शाळेत स्वयं शासन दिवस साजरा करुन पालकांना घडी पत्रिका वाटप करण्यात आले.यावेळी गणित व तज्ञ मार्गदर्शक श्रीमती संध्याताई बडुरे यांच्या हस्ते पालकांना अध्ययन निष्पती घडी पत्रिका वाटप करण्यात आले.तसेच पाचवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.यावेळी संध्याताई बडुरे व मुख्याध्यापक एस.बी.जट्टे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ए.एम. जगताप यांनी केले.तर आभार एस.बी.जट्टे यांनी मानले.या कार्यक्रमास प्रेरक आशा पवार,कल्पना पाटील,वनिता गर्जे,संजय गर्जे,सुनिल गर्जे,यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
