यवतमाळ(प्रतिनिधी मक़सूद अली)
घाटंजी येथील इस्तारी नगरमध्ये राहणारे मारोती अंबादास मोरे (60) हे दोन वर्षापुर्वी भुमिअभिलेख कार्यालयातून निवृत्त झाले होते. मागील दोन महिन्यापुर्वी त्यांनी सरकारी घाटंजी येथील सरकारी दवाखानामागे शेती घेतली होती. त्यांनी 13 मार्चचे दुपारच्या सुमारास भोंग यांच्या शेतातील निबांच्या झाडला गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घाटंजी परिसरात सतत होणाऱ्या आत्महत्या, विनयभंग आदींमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास ठाणेदार भावसार यांचे मार्गदर्शनात जमादार मेश्रे, रितेश श्रीवास्तव, आकाश ठाकरे करीत आहे.
