इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियातंर्गत लोहारा तालुक्यातील बारा तलावातील गाळ काढण्यात येत आहे.लोहारा तालुक्यातील उदतपुर येथे कामांचा शुभारंभ तहसिलदार शोभा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्यात मोठ्या प्रमाणात जलसाठे असुन त्यांची साठवण क्षमता वाढावी व धरणात साठलेला गाळ काढण्याच्या उद्देशाने शानसा मार्फत गाळमुक्त धरण व असलेला गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरुन हमितीची प्रत वाढावी या दृष्टीने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियातंर्गत योजना ग्रामविकास व जलसंधारण विभागाने जाहीर केली आहे.त्यानुसार पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.त्या अनुषंगाने तालुक्यातील बारा गावातील पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.त्यानुसार उदतपुर,करवंजी,लोहारा खुर्द,सय्यद हिप्परगा,मोघा, कानेगांव,जेवळी, कोंडजीगड मधील दोन,हराळी, सास्तुर,सालेगाव या गावातील तलावातील गाळ काढण्यात येणार आहे.यावेळी लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता ई.टी.सुर्यवंशी,नायब तहसिलदार के.एम.देशटवाड,अरुण सारंग,सरपंच माधवराव पाटील,ए.एस.जमादार,बाबुराव पवार, विठ्ठल,पवार,गोपाळ सुरवसे,कडाप्पा सुरवसे,गुणवंच दलाल,यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
