यवतमाळ (ब्यूरो रिपोर्ट)
सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने 15 मार्च रोजी उद्योग भवन, तिसरा माळा, दारव्हा रोड येथे प्रशिक्षणार्थी उमेदवारांचा भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्यात नामांकित कंपनीचे प्रतिनिधी / अधिकारी उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.जिल्ह्यातील 18 ते 40 या वयोगटातील रोजगार इच्छुक उमेदवारांनी 15 मार्च 2018 रोजी सकाळी 11 वाजता सर्व कागदपत्रांसह (बायोडाटा दोन प्रत, शैक्षणिक अर्हता, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आदी) स्वखर्चाने उपस्थित राहावे. तसेच विविध रोजगाराभिमुख संधी विषयी माहितीसाठी शासनाच्याhttps://rojgar.mahaswayam.in/ व श्रम व रोजगार मंत्रालयाच्या https://www.ncs.gov.in/pages/default.aspx या पोर्टलवर जाऊन जिल्ह्यातील रोजगार इच्छुक उमेदवार तसेच विविध उद्योजक यांनी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावी. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे किंवा 07232-244395 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास यांनी केले आहे.
