- शिवसेनेचे वतीने तेल्हारा न.प.मुख्यधिकारी यांना निवेदन द्वारे आंदोलनाचा इशारा
प्रवीण वैष्णव
तेल्हारा .:- गेल्या कित्येक दिवसापासून तेल्हारा शहरामध्ये दूषित व गढूळ पाण्याची समस्या जैशे की तैशे आहे तेल्हारा न.प.चे अधिकारी पदाधिकारी यांना पूर्ण माहिती असून यावर कोणताच ठोस उपाय नाही लवकरात लवकर दुषित पाण्याची समस्या मार्गी लावा करीता शिवसेनेचा वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
आज दिनांक 14-3 रोजी शिवसेना शहर चा वतीने तेल्हारा न.प.मुख्यधिकारी यांना निवेदन देण्यात आले तेल्हारा नगर परिषद मार्फत शहरात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेला पाणीपुरवठा गढूळ व दुषित होत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे शहराचा या दूषित पाण्यामुळे डायरिया किडनी स्टोन पोटाचा आजारासारख्या अनेक आजारांची लागवड झाली आहे शहरातील ग्रामीण व खाजगी दवाखान्यामध्ये पिण्याच्या दूषित पाण्यामुळे शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत याबाबत काही डॉक्टरांकडून वैदयकीय माहिती घेतली असता हे आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे डॉक्टरांकडून बोलल्या जात आहेत त्यामुळे नगर परिषदेच्या वतीने होत असलेला पाणीपुरवठा हा दूषित व गढूळ आहे या होत असलेल्या गढूळ व दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अनेक दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असून न.प.चे अधिकारी व पदाधिकारी यांना पूर्णपणे माहिती असून सुद्धा यावर न.प.चा माध्यमातून काहिही उपाययोजना
केल्या जात नसल्यामुळे न.प.या वाढत्या आजाराने त्रस्त नागरिकांचा मृत्यूची वाट पाहत आहे का? असा प्रश्न जनतेला पडला आहे होत असलेला गढूळ व दूषित पाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून न दिल्यास शिवसेना नागरिकांचा आरोग्यासाठी शिवसेना स्टाईल मध्ये आंदोलन करेल या सर्वस्वी तेल्हारा न.प.जवाबदार राहील करीता शिवसेना शहर प्रमुख विक्रांत शिंदे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यावेळी प्रसिध्द प्रमुख प्रविण वैष्णव उपशहर प्रमुख निलेश मुरेकर अमर ठाकूर प्रभाग प्रमुख गजानन मानोजळकार मा.श.प्र राजेश वानखडे जयंत गावंडे पप्पू सोनटक्के युवासेना शहर प्रमुख सचिन थाटे निलेश धनभर विवेक खारोडे अजय पाटील गावंडे पप्पू कामठे राहुल देशमुख मनीष गवळी हेमंत अवचार निलेश पलन विक्रम खारोडे राजेश खारोडे आकाश श्रीवास अशोक श्रीवास संतोष राठी शेख मुन्ना रहेमान शहा श्याम राहतोळे सुधाकर गावंडे राम वाकोडे गजानन मोरखडे गजानन चौहान सचिन मोरे धनराज सोनोने विजू वाघमोडे गजानन महल्ले राहुल पुधाके सागर अरुडकर निखिल माहुरे अमोल कवळे स्वप्नील सुरे इत्यादी शिवसेना आजी माजी पदाधिकारी व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
