मेल नर्सेस युथ क्लब वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ ,आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन यवतमाळ तर्फे रक्तदान शिबीर संपन्न.



मक़सूद अली
यवतमाळ :- आज दिनांक १९ मार्च सकाळी ११ वाजतामेल नर्सेस युथ क्लब वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन यवतमाळ जिल्हा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिराचे आयोजन 2005 नन्तर  लागलेल्या dcps/nps धारक कर्मचारी स्व विवेक भाऊ कुमरे स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आली होती राज्यात आतापर्यंत मृत झालेले dcps/nps धारक कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक छोटा प्रयत्न म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. जुनी पेंशन आणि कुटुंब निवृत्ती वेतन योजना आजपर्यंत  राज्यात  1775 कर्मचारी मृत पावले त्याच्या कुटुंबा ला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी साठी सुरवात यवतमाळ मधून मेल नर्सेस युथ क्लब आणि जुनी पेंशन हक्क संघटन GMC युनिट द्वारा घेण्यात आले एकूण 85 जुनी पेंशन हक्क युनिट आणि जिल्हा अध्यक्ष नदीम पटेल यांनी आणि सर्व  कर्मचारी बांधवांनी पेंशन साठी रक्तदान केले .एक सामाजिक कार्य करून वेगळ्या पद्धती ने आंदोलन ची सुरवात करण्यात आली आहे पुढे सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये एकच दिवशी लाखो 2005 नंतर लागलेले कर्मचारी रक्तदान करून नवीन पेंशन योजना विरोध आणि जुनी पेंशन योजना लागू करा हे शासनाला जागे करण्यासाठी रक्तदान कार्यक्रम सम्पूर्ण महाराष्ट्र राज्यात जुनी पेन्शन हक्क संघटन करणार आहे.शिबिरात सर्व dcps/nps धारक कर्मचारी उपस्थित राहून सामजिक बांधिलकी जपत रक्तदान केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post