इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथे श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा प्रवचन व दर्शन सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात वृत्तपत्रसृष्टीचा महाराजा दैनिक 'पुण्य नगरी' परिवारातर्फे नरेंद्राचार्यजी महाराज यांचा सत्कार करून स्वागत वृत्तसंपादक तथा जिल्हा मराठी पञकार संघाचे अध्यक्ष धनंजय (भैय्या) रणदिवे यांनी केला.यावेळी कळंब तालुका प्रतिनिधी विलास मळीक,एकुरगा प्रतिनिधी शंकर भोरे,अदि उपस्थित होते.
