भुूमिहीन व मोलमजुरी करणाऱ्या शिधापत्रिका धारकांना धान्य मिळावे यासाठी भाजयुमो सरसावली


तेल्हारा( प्रवीण वैष्णव )- तेल्हारा तालुक्यातील भूमिहीन व मोलमजुरी करणाऱ्या शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य मिळत नसल्याने त्यांना धान्य मिळावे यासाठी तेल्हारा तालुका भाजयुमो सरसावली असून तेल्हारा तहसीलदार यांना निवेदन देऊन याबाबत मागणी करण्यात आली. शहरासह तालुक्यातील भूमिहीन व मोलमजुरी करणाऱ्या कुटूंबाकडे शिधापत्रिका असून सुद्धा त्यांना स्वस्त धान्य मिळत नाही.तसेच स्वस्त धान्य दुकानदारांकडून सात बारा नसल्याचे सांगून त्यांना धान्य देण्यात येत नाही. तसेच दुकानदारांकडून योग्य माहिती देण्यात येत नाही.ज्यामुळे या कुटूंबाना आपल्याला का धान्य मिळत नाही.हे लक्षात येत नसल्याने त्यांना स्वस्त धान्य पासून वंचित राहावे लागत आहे. तरी तहसीलदार यांनी स्वता जातीने लक्ष देऊन या कुटूंबाना लाभ मिळवून द्यावा अशी मागणी भाजयुमो तेल्हारा तालुका अध्यक्ष सतीश जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी नगरसेवक मंगेश सोळंके,एकनाथ ताथोड,लखन राजनकार,भाजयुमो शहराध्यक्ष अक्षय पदवाड,गजानन गायकवाड,गोकुळ हिंगणकार,राहुल झापर्डे,छोटू विखे यांच्या सह अनेक भाजयुमो चे कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post