बोंडअळी तसेच गारपीट ग्रस्त शेतक-यांना विनाअट मदत द्या




  • शेतक-यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडणार - खासदार भावनाताई गवळी यांची ग्वाह


मक़सूद अली
 यवतमाळ :- बोंडअळी तसेच गारपीट ग्रस्त शेतक-यांना  मदत देतांना अनेक निकष तसेच अटी लावल्यामुळे मोठया प्रमाणात शेतकरी मदतीपासून वंचित राहीले आहे.दरम्यान शेतक-यांचा हा प्रश्न आपण शासन दरबारी लावून धरु अशी ग्वाही आज यवतमाळ वाशिम च्या खासदार भावनाताई गवळी यांनी दिली. जिल्हयातील काही शेतक-यांनी
आज यवतमाळात भावनाताई गवळी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपले दुख व्यक्त केले. यावेळी  शेतक-यांना धीर देत भावनाताईंनी मदतीबाबत लावण्यात आलेल्या अटी रद्द करण्याची मागणी आपण सरकार कडे करणार असल्याचे स्पष्ट केले. यावर्षी बोंडअळी तसेच गारपीटीने शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.  या नुकसानीची भरपाई देण्याची घोषणा सरकारने केली आहे. या मदतीसाठी अनेक निकष तसेच अटी लावण्यात आल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहीले. दरम्यान या क्लिष्ट अटी तसेच निकष बाजुला ठेऊन शेतक-यांना मदत झाली पाहीजे अशी आपली भूमिका आहे आणि सरकारला पत्र देऊन या अटी रद्द करण्याची मागणी सुध्दा करणार  असल्याचे भावनाताईंनी सांगीतले.33 टक्केची अट रद्द करा सरकारने बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीमध्ये तसेच गारपीटीने झालेल्या नुकसानीमध्ये 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्यांनाच मदत घोषीत केली आहे. यामुळे 33 टक्के पेक्षा कमी नुकसान झालेले लाखो शेतकरी मदतीपासून वंचित राहीले आहे. वास्तविक गेल्या तीन वर्षापासून नैसर्गीक संकटामुळे शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे ही अट रद्द करुन मदत देण्याची मागणी भावनाताई गवळी यांनी केली आहे. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीमध्ये बागायत आणि जिरायत अशी वेगवेगळी मदत घोषीत करण्यात आली आहे.  यामुळे सुध्दा शेतक-यांचे नुकसान झाले असून ही अट सुध्दा  रद्द करुन मदत करण्याची मागणी करण्यात येणार आहे.  अनेक शेतकरी वंचित जिल्हयात गारपीट ग्रस्तांना 14 कोटी  3 लक्ष  31 हजार रुपयांची मदत वाटप करण्यात येत आहे. यामध्ये 11हजार  90 हेक्टर क्षेत्र बाधीत असल्याचे सर्वेक्षणात दाखविले आहे. वास्तविक अनेक शेतक-यांना सर्वेक्षणातून वगळण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे शेतक-यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे  भावनाताई गवळी यांनी स्पष्ट केले आहे. 

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post