अंबिकादेवी विद्यालयाच्या विध्यार्थीनींचा प्रामाणिकपणा



जेतेश करिया
           आज हनुमान जयंती असल्याने दूरवरून लोक वारीच्या मारूतीच्या दर्शनासाठी येत असतात असेंच पणज येथील रमण अकोटकर  आपल्या मित्रासोबत दुचाकीने वारीला गेले असता त्यांचे पाकीट रस्त्यात पडले ते पाकीट वारखेड येथून सौन्दळ्याच्या अंबिकादेवी विद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या वर्ग 9 च्या विद्यार्थिनी कु.दिपाली वानखडे,कु सेजल वानखडे व कु.माया वानखडे यांना सापडले त्यात रोख रकमेसोबतच ATM कार्ड,आधार कार्ड,इलेक्शन कार्ड,ड्रायव्हिंग लायसेन्स इ.महत्वाची कागदपत्रे हाती.या विद्यार्थिनीने हे सापडलेले पाकीट प्रामाणिकपणे वर्गशिक्षक खूपसे सर यांच्या जवळ जमा केले.त्यांच्या या प्रमाणिकपणाबद्दल शाळेच्या वतीने घुंगड सर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी शिक्षक सर्वश्री कराळे,टाले,गोरद,गाढे,चांदूरकर,तराळे,कोल्हे तसेच पुंडकर,भिसे,मेतकर ,घोले यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी हजर होत्या.रमण अकोटकर यांनी सुध्दा विद्यार्थिनींच कौतुक करून 100 रु.बक्षीस दिले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post