इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील हनुमान मंदिरात चैत्रशुध्द पोर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेवुन हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आली.या मंदिरात दर्शनासाठी सकाळपासुन नागरीक व महिलांनी अलोट गर्दि केली होती.या निम्मिताने दि.३० मार्च रोजी रात्रभर विजयकुमार वेदपाठक व यांच्या सहकार्यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.व तसेच पूजा,महाआरती आदी विविध धार्मिक कार्यक्रम घेवन प्रसाद वाटप करण्यात आले.जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी बाळु माळी,प्रशांत लांडगे,बाळु माशाळकर,श्रीशैल्य स्वामी,हरी लोखंडे,गणेश खबोले,बाळु घोंगडे,अनिल ठेले,बाबा जाधव,पंडीत लोहार,सुनिल देशमाने,राजु महाणुर,राजु फावडे, प्रशांत रेणके,श्रीकांत तिगाडे, प्रविण कदम आदींनी परिश्रम घेतले.
