गनगौर उत्सवानिमित्त भव्य शोभायात्रासह विविध कार्यक्रम



यवतमाळ (प्रतिनिधि मक़सूद अली)
अखिल भारतीय मारवाडी महिला मिडटाऊन शाखा यवतमाळच्या वतीने गनगौर उत्सवानिमित्त सिंजारा मेला व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. राणी सतिमंदिर तलाव फैल येथे संपन्न झालेल्यास विविध कार्यक्रमामध्ये गौरी तेरे रूप अनेक नऊ देव्यांची रूपात स्पर्धा, नाटिका, डांस, आनंद मेळावा सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 20 मार्च रेाजी राणी संती मंदिर येथुन विशाल शोभायात्रा काढण्यात आली. हि शोभायात्रा राणीसती मंदिर लक्कडगंज , यवतमाळ येथुन प्रारंभ होवुन राजेंद्र नगर, स्टेट बँक चौक, अप्सरा टॉकीज , सराफ़ा लाईन, मेन रोड, पाचकंदिल चौक, येरावार चौक, मार्गे मार्गक्रमण करीत महादेव मंदिर येथे हि शोभायात्रा विर्सजीत झाली. या शोभा यात्रेमध्ये गनगौर उत्सवा निमित्त शोभायात्रेत पारंपारिक वेषभुषा परिधान करून मोठ्या संख्येने राजस्थानी समाजातील महिला सामील झाल्या होत्या. या प्रसंगी आयोजीत कार्यक्रमामध्ये राणीसती मंदिरचे मुरारी बाबु झुनझुन वाला माहेश्‍वरी मंडळाचे अध्यक्ष अशोकजी मालपाणी, ओसवाल समाजाचे अध्यक्ष प्रसन्न दप्तरी, समाजसेवी प्रविणजी निमोदिया, गिरीषजी अग्रवाल, सौ. पुष्पा मुंधडा, सौ. उज्वला अटल आदी मान्यवर याप्रसंगी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होत्या.


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post