अतुल नवघरे
लाखपुरी: भिमा कोरेगांव येथील शौर्य दिनाला महाराष्ट्रातील २६ संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन करण्याकरिता गले असता त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला. या हल्यामध्ये काहिनागरिकांना प्राण गमवावा लागला.या पार्शभुुमीवर हल्याचे मुख्य सुत्रधार संभाजी भिडे व मिलींद एकबोटे यांच्यावर आरोप निश्चित झाल्यानंतर फुले , शाहु ,आंबेडकर यांच्या विचाराचा असलेला महाराष्ट्र या राज्यात घटनाकेल्यानंतरही ३० दिवसपुर्ण होवुन मुख्यसुत्रधार संभाजी भिडे यांना अटक करण्यात येत नाही. म्हणजे कायद्याचे राज्य आहे की नाही. हा सामान्य मानसा समोर प्रश्न पडलेला आहे.याकरिता भारिप बहुजन महासंघाचे राष्टिय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आबेडकर यांनी भिमा कोरेगांवच्या हल्यांचा मुख्यसुत्रधार संभाजी भिडे यांनी २५ मार्च पर्यंत अटक करा अन्यथा आम्ही २६ मार्च ला मुंबई येथे घाटकोपर ते मुंबई विधानभवनाला घेराव घालु हि हाक दिल्या नंतर प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी महाराष्ट्रातील तमाम पक्षाच्या पदाधिका-यांना आदेश दिलेत. याकरिता मुर्तिजापुर तालुका अध्यक्ष विनोदभाऊ नागे यांच्या अध्यक्षतेखाली भारिप बंमसच्या कार्यालयात नियोजन बैठक घेण्यात आली . बैठकीला तालुक्यातील पदाधिका-यांनी मार्गदर्शन केले. २६ मार्चला मुंबई जाण्याकरिता गावापर्यंतच्या कार्यकर्त्यांना संदेश पोहचावा जास्तीत जास्त २६ मार्चला मुंबई येथे हजर व्हा असे आव्हान केले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष विनोदभाऊ नागे , महासचिव संजय नाईक , शहराध्यक्ष बाळा शितोळे , प्रधान गुरुजी , संजय तायडे , पंडित वाघमारे , सुनिल सरदार ,भैय्यासाहेब तायडे ,सौदागर खंडारे , सत्तार कुरेशी , मोहन रोकडे , महिला अध्यक्ष योगिता वानखडे , अंजली देशमुख ,ईगळे ताई , सोळंके ताई ,इम्रानभाई , वैभव यादव , मोहन वसुकार ,सुनिल सरोदे ,विनोद देशमुख , युवराज जोगंदड , बाळुभाऊ तायडे , बाळुभाऊ खंडारे , बाळुभाऊ ठोकळ ,किशोर टाक ,वसंत वानखडे ,प्रा. एल. डि. सरोदे , सुधिर ठोकळ ,प्रकाश मनवर ,सचिन दिवनाले अतुल नवघरे ,सुशिल सिरसाठ, राहुल तायडे बबन भालेराव डिगांबर साऊतकर , गोवर्धन सिरसाठ , पप्पु चौधरी , अतुल वाघ , निलेश आंबेकर , बाळुभाऊ भगत ,संदिप सिरसाठ ,अवधुत सिरसाठ , महादेव खांडेकर (सरपंच शेलु नजिक) राजेश खन्ना भोसले यांच्या उपस्थितीत नियोजन बैकठीचे सुत्रसंचालन राहुलभाऊ तायडे यांनी केले तर प्रास्ताविक संजय तायडे यांनी केले तर आभार मोहन वसुकार यांनी मानले.
