इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे दि.6 एप्रिल रोजी ‘महाभाजपा-महामेळावा’ होणार आहे़.यासंदर्भात भाजप मीडीया विभागाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली आहे़.उस्मानाबाद शहरातील शासकीय विश्रामगृहात दि.30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता हि बैठक होणार आहे़. या बैठकीस प्रमुख म्हणुन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर उपस्थित राहुन सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे,प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड़.अनिल काळे,प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीर पाटील,प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड.नितीन भोसले,ॲड़.व्यंकटराव गुंड, सुरेश पाटील,अदि उपस्थित राहणार आहे़त.तरी या बैठकीस भाजप मीडीया विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन भाजप मिडिया विभागाचे जिल्हा अध्यक्ष धनंजय रणदिवे, सरचिटणीस मिलिंद कुलकर्णी,जीवन गायकवाड, पार्श्वनाथ बाळापुरे,राहुल कोरे यांनी केले आहे़.
