विलास नसले
मूर्तिजापुर :- पतंजली योग समिती मुर्तिजापुरच्पा वतीने नुतनताई हरीष पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्राचार्या श्रीमती कुमुदताई दुबे तसेच प्रा.डाॅ.मनिषा यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत ,मोफत आरोग्य मेळावा पार पडला.कार्यक्रमाला नवाब क्लिनीकल लेबाॅरेटरी टिम यांचे विशेष सहकार्य लाभले डाॅ. कल्पना बियाणी व डाॅ.स्वाती पोटे यांनी उपस्थित महीलांची तपासणी करुन त्या त्या रोगानुसार प्राणायम व आसना द्वारे उपचार केले.कार्यक्रमाचे आयोजक संत गजानन महाराज संस्थान विश्वस्थमंडळ यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम शिस्तीत पार पडला प्रतिष्ठितांचे असेच सौजन्य असल्यास महिलांच्या सशक्तीकरणाकरिता महिलांचे संघटन करण्याकरीता प्रसंगानुरुप अपणअशा कार्यक्रमाचे आयोजन करु.असे विचार डाॅ.स्वाती पोटे यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडले उपस्थित मान्यवरांनी गुढिपाडवा हा दिवस महिला दिन म्हणुन जाहीर केल्याबध्दल पतंजलीचे आभार मानले पतंजलिच्या सर्व साधकांनी तसेच विलास वानखडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता अथक परीश्रमघेतले सौ.ज्योती बनसोड यांनी संचलन तर आभार सौ.वैशाली आंबेकर यांनी मानले
