विलास नसले
मुर्तिजापूर प्रतिनीधी :- तालुक्यातील घुंगशी बॅरेज येथून पाईपलाईन टाकून मुर्तिजापूरकरांना उन्हाळयात पाणीटंचाईचे चटके जाणवू नये याकरीता पाणी आणण्याचे प्रयत्न आमदार हरिष पिंपळे, नगराध्यक्षा सौ.मोनाली कमलाकर गावंडे यांच्या प्रयत्नातुन सुरू आहे. सदर पाईप लाईन टाकण्याचे काम जलद गतीने केले जात असून सदयस्थितीत खरप ढोरे शिवारापर्यंत पाईपलाईनचे काम आले आहे. त्यामुळे येणा-या काही दिवसात मुर्तिजापूर येथील जलषुदध्ीकरण केंद्र येथे पाणी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याकामाची पाहणी नुकतीच आमदार हरिष पिंपळे यांनी भेट देवून केली. त्यावेळी त्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक सुनील पवार, माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, कमलाकर गावंडे तसेच बबलु भेलोंडे, नसीरभाई, गजानन नाकट यांची उपस्थिती होती.
