- बाळापुरतालुक्यातील शेतकऱ्यांनी दिले
- युवा सेना जिल्हा प्रमुक विठ्ठल सरप पाटील यांच्या नेतृत्वात निवासी उप जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांना निवेदन दिले.
अकोला दि.२७ (प्रतिनिधी) बाळापुर तालुक्यातील वाडेगाव येथील शेतकरी असून सदर शेती मधून महाराष्ट्र इंस्तर्ण ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनी ली.औरंगाबाद या कंपनीने टाकलेल्या टावर मुळे व हाय टेन्शन लाईन मुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सदर टावर मुळे व हाय टेन्शन लाईन मुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून हाय टेन्शन लाईन मुळे भविष्यात सुद्धा नापिकी होण्याची शक्यता आहे. तसेच जीवित्याच्या धोक्या मुळे मजूर हाय टेन्शन लाईन टावर मुळे शेतीचे नुकसान,शेतकर्यांना जागेचा मोबदला द्या...
सुद्धा काम करण्यास तयार नाही.तसेच फलधारणा व पिक या वर सुद्द्धा परिणाम झाला आहे. तसेच ट्रकटर व इतर लोखंडी अवजाराने ओलाव्यात काम केले असता अर्थिंग सुद्धा लागत असल्याचे जाणवत आहे. व
विद्युत लहरीचा परिणाम सुद्धा होत आहे. आमच्या अज्ञान पानाचा फायदा घेऊन सदर कंपनीने अल्प मदत देऊन आमची फसवणूक केली.
टावर मुळे व हाय टेन्शन लाईन मुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सदर टावर मुळे व हाय टेन्शन लाईन मुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून आमच्या कुटुंबाची विस्कळीत झाली आहे.
दिनांक ३१मे २०१७ रोजीच्या शासकीय परिपत्रका नुसार व आम्हाला मिळणाऱ्या पिकाच्या वार्षिक उत्पनाची मर्यादा निश्चित करून त्या प्रमाणात सदर कंपनी कडून कायम स्वरुपाची रक्कम सुद्धा देण्यात यावी अशी मागणी करत
युवा सेना जिल्हा प्रमुक विठ्ठल सरप पाटील यांच्या नेतृत्वात शेतकर्यांनी निवासी उप जिल्हाधिकारी श्री श्रीकांत देशपांडे यांना निवेदन दिले जर नुकसान भरपाई लवकर मिळाली नाही तर मोठ्या प्रमाणात शेतकरी उपोषणाला बसतील अशी तंबी या वेळी शेत्कायांनी केली. या वेळी शेतकरी दीपक सरप,किसन गव्हाळे,जानराव अंभोरे,
गंगाधर सरप,कोकिला सरप ,अरुण अंभोरे,दिनेश गवई,रामभाऊ कळंब,गोविंदराव घाटोळ,प्रल्हाद भटकर,गुलाम जाफर, गुलाम हुसेन,गुलाम जाकीर,गुलाम मोईन,अरुण मसने,वासुदेव सरप,श्रीराम हाडोळे,मंगेश धनोकार,
केशव नावकार,ज्ञानदेव डोंगरे,शेख शब्बीर,शेख करीम,तोताराम धर्माळे,महेबूब खान,विलास मानकर,जानराव अंभोरे, अरुण अंभोरे,दिनेश गवई,किसण गव्हाळे,पुंडलिक पुंडकर,गजानन जुमळे,नितीन सरप,नारायण उमाळे,कमला बाई खोडके,रामकृष्ण सरप,आशाबाई सरप,वासुदेव सरप,शेख मुस्तफा,प्रकाश खंडारे,महेंद्र मंगलकर,गोकर्णा बाई ढोरे,
शेख सादिक,तोताराम धर्माळे,दुर्गाबाई भटकर,संजय कातखेडे,सरस्वती वाडकर,गुलाबराव जंजाळ,चंद्रभान डोंगरे,
नारायण भूम्बरे,सुनंदा भूम्बरे,वैभव धर्माळे आदि शेतकर्यांनी स्वाक्षरी करून निवेदन दिले.

