इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी:- लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील शिवकाळापासुन प्रसिध्द असलेल्या नवसाला पावणाऱ्या हनुमान जयंतीनिमित यात्रा महोत्सवास दि.30 मार्चपासुन सुरुवात होत आहे.हा यात्रा महोत्सव दि.2 एप्रिलपर्यत सुरु राहणार आहे.या महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या यात्रा महोत्सवासाठी राज्यांच्या कानाकोपऱ्यातुन हजारो भाविक हनुमानाच्या दर्शनासाठी येतात.
नवसाला पावणारा हनुमान म्हणुन येथील मंदिराकडे पुर्वीपासुन पाहिले जाते.अनेक भाविक भक्तांनी बोललेला नवस पुर्ण झाल्याने दिवसेंदिवस हनुमानाच्या भक्तामध्ये वाढ होत आहे.गाव सोडुन परगावी व्यवसाय उद्योग,नौकरीसाठी गेलेली मंडळी . दिवाळी दसऱ्याला गावाकडे येत नाहीत.मात्र हनुमान यात्रेला सर्व जन येतात.त्याहनुमान जयंतिनिमित भरगच्च.या यात्रेमध्ये पुर्वीपासुनच नाटकांची परंपरा आज हि जीवंत आहे.काही वर्षापुर्वी या यात्रेत तमाशाचे आयोजन करण्यात आले होते.मात्र तमाशा सुरु होताच.हनुमान मंदिरासमोरील लोखंडी बारगजीचा भाग आपोअप खाली कोसळला गेला. म्हणुन तेव्हा पासुन नाटकाची परंपरा आज हि उंडरगाव नगरीत पहाण्यास मिळते.जयंतीनिमित भाविकभक्तासाठी ज्ञानप्रबोधनपर किर्तन,मल्लासाठी कुस्ती आखाडा तर नाटय प्रेमीसाठी संगीत भडकला अग्नी सुडाचा.हे नाटक तर रसीकाकरीता मी लावणी महाराष्ट्राची हि मेजवानी दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे जयंती सोहळयासाठी अवघा परिसर सज्ज झाला आहे.हनुमान जयंतीनिमित मंदिराची रंगरंगोठी करुन विधुत रोशनाई करण्यात आली आहे. जयंतीचे औचित्य साधून दि 30 मार्च ते दि.2 एप्रिल या चार दिवसात किर्तन,शोभेच्या दारुची आतिशबाजी, भारुड गायन,हारिजागर,श्रीची मिरवणुक,कुस्त्या, नाटक,लावणी,अदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दि 30 रोजी रात्री 9 वाजता गायीका रेखाताई कल्याणकर भालकी,नामदेव आदटराव गुरूजी संगीत अलंकार,व्यकटराव कदम हामॉनियम, रामभाऊ ढेकळ तबला संगीत विशारद यांचा मधुर स्वरांजली कार्यक्रम तर दि. 31मार्च रोजी संध्याकाळी शोभेच्या दारुची अतिशबाजी नंतर ज्ञानप्रबोधनकार ह.भ.प.नितीन जगताप यांचे किर्तन सेवा,दि 1 एप्रिल रोजी सकाळी श्रीची व महादेव कावडीची गावातुन मिरवणुकी नंतर रात्री ठिक 9 वा संगीत भडकला अग्नी सुडाचा हा तीन अंकी नाटक दाखविण्यात येणार आहे.दि.2 एप्रिल रोजी सकाळी 11 वा सुप्रसिध्द भारुडकार कलापथक लातुर 4 वा जंगी कुस्त्या,रात्री 9 वा मी लावणी महाराष्ट्राची निमिर्ती स्वाती देशमुख कलामंच पुणेकर सादर करुन या यात्रेची सांगता होणार आहे.या यात्रेचा भाविक भक्तानी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहान यात्रा कमिटी व उंडरगाव ग्रामस्थांनी केले आहे.
