अतुल नवघरे
लाखपुरी: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची प्राथमिक विभागची स्थापना राज्य उपाध्यक्ष श्री.प्रकाश चतरकर सर यांच्या नेतृत्वात झाली आणि बघता बघता जिल्हयातील सातही तालुक्यात अवघ्या दहा महिन्यात कार्यकारिणी गठित झाली.संघटन कौशल्य,मनमिळाऊ,अभ्यासु,अष्टपैलु व्यक्तिमत्व श्री.प्रकाश चतरकर जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणीने यांनी शिक्षकांच्या समस्याचे निराकरण केले त्यामुळे जिल्हयात म.रा.शिक्षक परिषदचे नावलौकिकास आले व आज सातही तालुक्यात शिक्षकांचे प्रश्न निकाली काढण्यास कार्यकारिणी शिक्षकांसोबत खंबीरपणे उभी आहे. चटोपाध्यायचा प्रश्न,मेडीकल बिल,सि.पी.एफचा प्रश्न असो संघटनेने सतत पाठपुरावा करुन काही प्रश्न निकाली काढले व काढत आहे.सन्मानीय श्री.रणजित पाटील हे संघटनेचे मार्गदर्शक आहे.श्री.प्रकाश चतरकर,श्री.सचिन काठोळे,श्री.नितीन बंडावार व श्री.शाम कुलट यांच्या अथक परिश्रमामुळे आज म.रा.शिक्षक परिषद ही संघटना संपूर्ण जिल्ह्यात नावारूपास आली.
