अतुल नवघरे
लाखपुरी:२८,मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी येथे दि.२७-२-२०१८ ला अर्चना विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कविवर्य श्री. अ .शे . देशमुख तर प्रमुख पाहुणे श्री . के.एन. राऊत गुरूजी होते .तसेच प्रमुख उपस्थितीत से.नि.शि.सन्माननीय श्री . कोथळकर सर व सन्माननीय श्री . एस डी चव्हाण मुख्याध्यापक हे होते. या प्रसंगी इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यींनी १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देत असतांना आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये कु. दिपीली जोगी , कु .प्राजक्ता जामनिक, कु.प्रज्ञा मेश्राम, रोहण उभाळ हे विद्यार्थी होते. त्याचप्रमाणे इयत्ता १० वी च्या विद्यार्थांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये शुभम लोखंडे चे इंग्रजी भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले. त्या नंतर निकीत जामनिक , कु. स्नेहा सुरजुसे ,कु. नंदीनी मेहर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी श्री. वाय.डी. लहाने यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा सबंधी मार्गदर्शन केले. श्री. पोहणकर सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. श्री. नाचणे सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की पेपर सोडवतांना शांतता, संयम , ठेऊन पेपर सोडवावेत व आहारावर नियंत्रण ठेवावे त्याच प्रमाणे विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे.
मुख्याध्यापक श्री. एस. डी. चव्हाण सर यांनी परीक्षा सबंधी सुचक मार्गदर्शन व सर्व प्रकार चे सहकार्य करू असे त्यांनी त्यांच्या भाषणा मधून सांगितले. श्री. कोथळकर सरांनी सर्व प्रथम विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिना विषयी माहीती सांगतांना महान साहीत्तीक कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्म दिन या दिवसी महाराष्ट्र सरकारने मराठी भाषा दिन साजरा करण्याचे जाहीर केल असे त्यांनी अापल्या भाषणा मधून सांगितले आणि त्यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचे महत्त्व विशद करून सांगतांना ते म्हणाले की,"कंन्या सासराशी जाये ! मागे परतून पाहे! संत तुकारामाच्या अंभगाचा संदर्भ दिला. अध्यक्षांनी त्यांच्या भाषणा मधून मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितीत मध्ये ज्येष्ठ शिक्षक. श्री. डोंगरे सर, श्री.अवघड सर, श्री. राजपुत सर, पांडे मँडम ,मुंगोना मँडम तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. सुनील चव्हाण, श्री. जगन्नाथ अंबाडे, श्री. सुभाष इंगळे,श्री. रविंद्र देशमुख ,श्री. राजेंद्र खंडारे आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.एस .पी . हरसुले सर यांनी केले. व आभार प्रदर्शन कु. डी. एम. काळे यांनी केले.

