शेतकरी सेमिनार 25 ला

मक़सूद अली 
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरींची समस्या व त्यातून निर्माण झालेल्या निराशेच्या गर्तेतून शेतकरी बांधवांना बाहेर काढण्याचा प्रयत्नांचा एक भाग म्हणून येथील जवाहरलाल दर्डा श्रोतृग्रुह येथे 25 मार्चला दुपारी 1 ते 5 या वेळात शेतकरी सेमिनार आयोजित केले आहे. यात माजी कृषी आयुक्त तथा महाराष्ट्र पर्यावरण विषयक तज्ञ समितीचे अध्यक्ष डॉ.उमाकांत दांगड, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, प्रयोगशिल शेतकरी अंकुश पडवळे सोलापूर व बाळासाहेब खेमनार  नाशीक यांना आमंत्रीत केले आहे, ज्ञान तंत्रज्ञान व प्रत्यक्ष अनुभवाच्या या संगमाचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक पुरूषोत्तम गावंडे यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post