- हुतात्मा चे क्रांतिकारी विचाराणे राष्ट्राचा विकास घडवावा — सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पुराणे
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील आलूर येथील जिल्हा परिषद प्रशाला क्रांतिकारक भगतसिंह,राजगुरु,सुखदेव यांची फाशी दिवस शहीद दिन म्हणून साजरा करण्यात आला.या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व बस्व प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामलिंग पुराणे बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक अन्नप्पा मुळजे होते.तर यावेळी प्रमुख म्हणून वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद जिल्हा अध्यक्ष किरण गायकवाड़,संभाजी ब्रिगेडचे मोहन जाधव,चंद्रकांत शंके,अदि उपस्थित होते. यावेळी शालेतिल शिक्षक सुनील राठोड सर यांनी क्रांतिकारीवर कविता सादर केली.विद्यार्थिनी भाग्यश्री भाकरे,लाडप्पा बोळदे,आकाश लादे,महेश गुंडने, अंगद पीचे,संदीप वाकड़े आदिनी भाषणे केली.
तसेच यावेळी बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामलिंग पुराणे,जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड़,संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष मोहन जाधव,यांनी विद्यार्थ्यांना हुतात्मा भगतसिंह,राजगुरु,सुखदेव यांच्यावर व्याख्यान देवून यांचे विचार आत्मसाथ करून राष्ट्रहितासाठी युवकानी पुढाकार घ्यावे व हे क्रांतिकारक विचार प्रसार करून देश रक्षण,देश विकासासाठी प्रयत्न करावे असे सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सद्दाम बंदगी यांनी केले तर आभार सुनिल राठोड सर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माकने सर,कांबळे सर,राठोड सर,दिलीप सर,गायकवाड़ सर आदिनी परिश्रम घेतले

