श्री महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सव आदिवासी मुलांच्या शाळेतील 200 मुलांना कपडे व अन्य सामग्रीचे वितरण -भारतीय जैन संघटना यवतमाळ चा उपक्रम



मक़सूद अली 
यवतमाळ. भारतीय जैन संघटना यवतमाळच्या वतिने श्री महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला. या प्रसंगी 29 मार्च 2018 रोजी जवळच असलेल्या मोहा येथील आदिवासी मुलांच्या सृष्टि शाळेमध्ये 200 मुलांना जुने व नवे कपडे, स्कूल वॉटर बैग, फळ व अन्य सामग्रीचे वितरण केल्या गेले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन प्रसन्नमलजी दफ्तरी, सुभाष आंचलिया, रविबाबु कोठारी, डा. रमेश खिवसरा, दिनेश बोरा, विजय बुंदेला, वंदना ठाकरे, नगरसेवक विजय खडसे आदी उपस्थित होते. कार्यक्र माची सुरूवात नवकार मंत्र ने दिनेशबाबु बोरा ने केली. त्यानंतर वंदनाताई यांनी मुलांच्या जिवनता येणा-या अडचणी व शाळेच्या वतिने करण्यात येणारे प्रयत्न यावर प्रकाश टाकला. केसरिया मंदिर चे अध्यक्ष  दफ्तरी ने जिवनातील शाकाहार चे महत्व समझावुन सांगीतले. कार्यक्रमाचे संचालन कु.रोशनी बोरुंदिया ने तर प्रस्तावना डॉ. शेखर बंड यांनी केली. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता व समाजातुन 200 ड्रेसेस जमविण्याकरीता महेंद्रजी सुराणा, महेंद्र बोरा, जिनेंद्र बंगाले,सुशील कटारिया, प्रमोद मुथा, हितेश सेठ,धीरज तोडरवाल, अक्षय कर्णावट, मनोज सेठिया,प्रकाश बोरुंदीया,  महावीर दर्डा, श्रीपाल मुथा, सुमित कोचर, तिलक गुगलिया, हितेश रुनवाल, सौ पुष्पा तोडरवाल, मोनिका कोठारी, पूजा मुथा, कीर्ति मुथा,  वंदना बोरुंदिया,  शोभाताई पंडित,  वर्षा तातेड,  आरती पिपरिया,  मिना बोरा, ममता दुग्गड,  मधु देसाई,  सीमा तातेड  आणि सर्व भारतीय जैन संघटना शहर शाखे चे श्रावक आणि श्राविकांनी अमूल्य योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी महेंद्र बोरा यांनी शाळा, सर्व सदस्यांनी आणि सर्व अतिथी यांच्या प्रति आभार व्यक्त करून कार्यक्रमाच्या समापनाची समाप्तीची घोषणा केली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post