मक़सूद अली
यवतमाळ. भारतीय जैन संघटना यवतमाळ जिल्हा पूर्व विभाग व महात्मा ज्योतीबा फूले कनिष्ठ महाविद्यालय, वाढोणा बाजार येथे दोन दिवसीय युवती सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शेरअली लालाणी तसेच प्रमुख मार्गदर्शक रत्नाकरजी महाजन, प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शक सुभाषचंदजी आचलीया, विदर्भ कार्यकारणी सदस्य डॉ. शेखर बंड, जिल्हाध्यक्ष पूर्व विभाग जिनेंद्र बंगाले, जिल्हाध्यक्ष पश्चिम विभाग महेंद्र बोरा, महिला जिल्हाध्यक्ष चंदा खाबीया, प्राचार्य जितेंद्र शेंडेकर उपस्थित होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक रत्नाकरजी महाजन यांनी मुलींच्या आयुष्याला वेगळी कलाटणी देण्यासाठी ही कार्यशाळा अतिशय उपयुक्त आहे, असे आपल्या मार्गदर्शनात सांगीतले. या शिबीरामध्ये 70 युवतींनी सहभाग घेऊन कोर्स पूर्ण केला व तो युवतिंनी खुप आनंदाने स्विकारला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी योग्य मार्गदर्शन केले. तसेच 21 व्या शतकामध्ये युवतींनी मित्र, मैत्रिण व पालकांशी कसे वागावे या विषयावरील लघुनाटीका व प्रोजेक्टर द्वारा प्रमुख प्रशिक्षक रत्नाकरजी महाजन यांनी प्रभावीपणे सांगीतले. व उपस्थित युवतींनी व त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सांगता उपस्थित युवती व त्यांच्या पालकांनी या कार्यशाळे बद्दल आपले मत व्यक्त करून हा कोर्स युवतींनसाठी महत्वपूर्ण आहे असे म्हणुन समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे मंच संचालन गजानन रंदळे यांनी तर आभार प्रदर्शन श्यामसुंदर चलाख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जैन संघटना यवतमाळ जिल्हा पूर्व विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रिती महाजन, जिल्हा सचिव नीता बोथरा, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार इंगोले, रविंद्र कहाते, दिलीप कहाते व प्रसिद्धी प्रमुख हर्षा पोकरणा व महाविद्यालयाचे कर्मचारी रुपाली वाघ, अर्चना पडोळे, अतुल राऊत यांनी अथक प्रयत्न केले.
