भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर वाघापूर येथे महावीर जयंती उत्साहात साजरी



शनिवार ता ३१ मार्च - यवतमाळ (प्रतिनिधि मक़सूद अली)
यवतमाळ स्थानीय महावीर नगर वाघापुर येथील श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे मूलनायक भगवान महावीर जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी दि. 28 मार्च ला दिगंबर जैन महिला मंडळा तर्फे महावीर विधान पुजचे आयोजन करण्यात आले होते. दि. 29 मार्च ला सकाळी 7 वाजता ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या नंतर शेकडो समाजबांधवाच्या उपस्थितीमध्ये भगवान महावीर स्वामीच्या प्रतिमेची रथामध्ये स्थापना करून प्रभातफेरी सुरूवात महावीर जैन मंदिर, जयविजय चौक, बंड संकुल ते महावीर नगर या मार्गा ने मार्गक्रमण करून जैन मंदिर येथे समारोप झाला. या प्रसंगी आर्यनंदी वाचनालय व सभागृह या वास्तुच्या बांधकास ज्यांनी मदद केली अश्या मान्यवरांचा सत्कार समारोह संपन्न झाला. या नंतर मूलनायक भगवान महावीरांच्या प्रतिमेचा अभिषेक संपन्न झाला. कार्यक्रमाची सांगता वात्सल्य भोजनाने झाली.कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी दिगंबर जैन मंडळ व दिगंबर जैन महिला मंडळाच्या कार्यकत्र्यांनी अथक परिश्रम घेतले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post