मुर्तिजापूर स्वच्छता अभियानाचे वतीने संत गाडगे बाबांना अभिवादन


मुर्तिजापूर प्रतिनीधी :- विदर्भ भूमितील रत्न, वैराग्यमुर्ती, वैज्ञानीक दुश्टीकोण असलेले महान संत गाडगे बाबा यांना  जयंतीदिनाचे औचित्य साधून  मुर्तिजापूर स्वच्छता अभियान मुर्तिजापूरच्या वतीने अभिवादन करण्यात आले. मागील तीन वर्ष  आणि पाच महिन्यंापासून सतत शहरात स्वच्छता अभियाना सोबत इतर उपक्रम राबविणारे व अकोला येथील मोर्णा नदी स्वच्छता उपक्रमात सतत सहभागी होणा-या मुर्तिजापूर स्वच्छता अभियानाच्या वतीने बाबांचे कार्य व संदेश कृतितुन समाज मनात  पोचविण्याचा  प्रयत्न सुरू आहे. शहरातील गलिच्छ अवस्था झालेल्या विश्रामगुहाची स्वच्छता करण्याचे कार्य अभियानाच्या वतीने सुरू आहे. याठिकाणी अभियानाच्या स्वच्छता दुतांनी संत गाडगे बाबा यांना अभिवादन केले व त्यांचे कार्य पुढे जोमाने नेण्यासाठी सतत कार्यरत राहण्याचे सर्वांनी यावेळी सांगितले. या वेळी अभियानाचे सदस्य प्राचार्य सत्यनारायण तिवारी, माजी मुख्याध्यापक ज्ञानेष्वर भड, सुभाष बोधडे सर, विलास नसले , रोहीत सोळंके, विलास वानखडे, दिनेश श्रीवास, सुरेंद्र भेलोंडे, अमोल तातुरकर, विठठल काकोडे, रावसाहेब अभ्यंकर, मिलंीद इंगळे, सुशिल दमोहा, प्रतिक यदवर, गजानन पवार, विठठल कांबळे, तीवस्कर भाउ,कमलेष गोस्वामी, प्रषांत कांबे, रवि चव्हाण,  सचिव हिवराळे,नागेश डोगोर ,नाजूक घूमसे, विष्णू लोडम  आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य तिवारी सर व विलास नसले यांनी विचार व्यक्त केले. सुत्रसंचालन विलास वानखडे यांनी केले तर आभार रोहित सोळंके यानी केले.

रणवीर महाराणा प्रताप मंडळा तर्फे गाडगे बाबांना अभिवादन.

जुन्या षहरात उडाण पुला जवळ रणवीर महाराणाप्रताप मंडळा तर्फे संत गाडगे बाबा यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी विठठल काकोडे, रोहित सोळंके, सुनिल वानखडे, नसीम खान निलेष गावंडे, गणपत बुधेकर, अमोल तातुरकर, लतीफ भाई, संजय मस्के, नंदु बननोर,  आदींची उपस्थिती होती.


आमदार हरिश पिपंळे यांनी केले गाडगे बाबांना अभिवादन


येथील लकडगंज भागात आमदार हरिश पिपंळे यांच्या कार्यालयात संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त बाबांच्या फोटोला आमदार हरिश पिंपळे यांच्या हस्ते पुश्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले.


भारीप - बमसं तर्फे संत गाडगे महाराज यांची 142 वी जयंती साजरी 

मुर्तिजापूर येथील गौरक्षण संस्था येथे भारिप बहुजन महासंघ तर्फे गाडगे महाराज यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी भाउसाहेब खांडेकर, संजय नाईक, सौदागर खंडारे , नगर सेवक वैभव यादव, योगिता वानखडे, मोहन वसुकार संजय तायडे, सुनिल सरदार, किरण डोंगरदिवे, अभिशेक कांबळे, सागर नाईक, डाॅ. बाळासाहेब कावरे, सतिष सोनवणे यांच्यासह कार्यकत्र्यांची उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post