संत गाडगेबाबांचे कार्य समाजाला दिशादर्शक – जिल्हाधिकारी डॉ. देशमुख


 यवतमाळ, दि. 23 : संपूर्ण समाजाला स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे बाबा हे एक महान व्यक्तिमत्व होते. जवळपास दीडशे वर्षांपूर्वी त्यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शासनाने स्वच्छतेसंदर्भात अनेक योजना सुरू केल्या. यात प्रामुख्याने स्वच्छ भारत, निर्मल भारत, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता व नागरी स्वच्छता अभियान यांचा समावेश असून त्यांचे कार्य समाजाला आजही दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, राष्ट्रीय सुचना केंद्राचे प्रमुख राजेश देवते, जिल्हा पुरवठा अधिकारी भराडी आदी उपस्थित होते. गाडगेबाबांनी ग्राम स्वच्छतेचे महान कार्य केले, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, गाडगेबाबांनी हातात झाडू घेऊन गावातील रस्ते आणि गटार साफ केले. तसेच लोकांच्या मनात असलेली अंधश्रध्दा दूर व्हावी, याकरीता किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी लोकांचे प्रबोधन केले. यातून गोळा होणारा निधी त्यांनी समाज कार्यासाठी उपयोगात आणला. स्वच्छतेचे ते एक महान पुजारी होते, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.यावेळी राजस्व विभागातील ममता निचत यांनी गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन भारती जाधव यांनी केले. कार्यक्रमाला यवतमाळचे तहसीलदार सचिन शेजाळ, विभा घोडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post