जिल्हा परिषद शाळा देवरी येथे गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी


आज दि . २३ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हा परिषद शाळा देवरी येथे गाडगे महाराज जयंती  अतिशय उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली . यावेळी शा . व्य .स. अध्यक्षा सौ . लक्ष्मी वि . चव्हाण यांच्या हस्ते गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात प्रमुअ श्री. फलके सर यांनी गाडगे महाराजांच्या जीवनावर व कार्यावर प्रकाश टाकला. गाडगे महाराज जयंती  निमीत्त यावेळी विद्यार्थांनी गाणे व भाषणे दिली . यावेळी गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारीत माहितीपट प्रोजेक्टरवर दाखवण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन करुन गाडगे महाराजांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. शेवटी विद्यार्थ्याना खाऊचे वाटप करून तसेच उपस्थित मान्यवरांना चहापाणी देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सअ श्री. लाहोळे सर यांनी केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post