जलाशयातील मत्स्यव्यवसाय विकास प्रशिक्षणाचा समारोप

यवतमाळ, दि. 26 : कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत जलाशयातील मत्स्यव्यवसाय विकास या विषयावर घेण्यात आलेल्या तीन दिवशीय प्रशिक्षणाचा समारोप नुकताच करण्यात आला. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त शा.प.गोटफोडे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता अ.ना.बहादुरे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.एस.यु.नेमाडे, कार्यकारी अभियंता डी.जे.राठोड, सहाय्य्‍ाक आयुक्त सु.नो.सुखदेवे, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी प.दे.बसवंत आदी उपस्थित होते.यावेळी जलाशयात पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन, मत्स्यबोटुकली उत्पादन, कोळंबी संवर्धनसह इतर जातीचे मत्स्यसंवर्धन, शोभीवंत माशांचे व्यवसाय, सायप्रिनस माशांचे संवर्धन व प्रजनन, मत्स्यजीरे संगोपन, तंत्रज्ञान व मत्स्यबोटुकले उत्पादन, मत्स्यबिज/मासळी वाहतून सुरक्षा व पणन, मार्केटिंग कौशल्य, जलाशय विकास अनुषंगाने मासळी संकलन केंद्र व दळणवळण, जलाशयातील खोल पाण्यात मत्स्यव्यवसाय कौशल्य, मत्स्यत्पादन वाढविण्याच्यादृष्टीने आधुनिक साहित्य आदी विषयांवर सदर प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post