गरज युवा पिढीला महापुरुषांचे विचार निर्माण करा : सी टी इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी


मनीष वानखडे.                

  • शिवजयंती निमित्त महात्मा फुले जयंती उत्सव समितीचा मोठा उपक्रम

अकोट प्रतिनिधी : या वर्षी मिरवणुकीला फाटा देत वैचारिक शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प केला आहे शालेय पाठ्यपुस्तका बाहेरील व पराक्रमापलीकडील शिवराय विध्यार्थ्यांना कळावे या उद्देशाने पुस्तक वाटप करण्याचा कार्यक्रम केला आहे कारण शिवरायांचे विचार डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेण्याचा विषय आहे तसेच महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने 250 महापुरुषांच्या विचारांचे पुस्तके सर्वप्रथम नगर परिषद शाळा क्र 7 मध्ये नगर सेवक मंगेश चिखले मुख्याध्यापक श्री पिंजरकर सर व उपस्थित शिक्षकवर्ग यांच्या हस्ते प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेऊन विजेत्यां विध्यार्थ्यांना पुस्तके वाटण्यात आली. त्यानंतर पुढील न प शाळा क्र 6 मध्ये फ्रीडम कॉन्व्हेंट चे संचालक मनोज झाडे व पाणी पुरवठा सभापती मानिश कराळे समाज सेवक विजय ढेपे विश्वजित सुपासे सचिन वानखडे, रंधे मॅडम यांच्या उपस्थितीत प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम घेऊन पुस्तके वाटप करण्यात आली
न.प.शाळा क्र 5 मोठे बारगण येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर प्रतिक गोरे  गणेश चंडालिया व सर्व शिक्षकगण यांच्या उपस्थितीत पुस्तके वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आला व पुढील कार्यक्रम दगडी शाळा मध्ये अकोट उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी  छगन इंगळे  यांच्या हस्ते प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम घेऊन पुस्तके वाटप करण्यात आली व त्यांनी विध्यार्थाना करियर बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले  या कार्यक्रमाकरिता कोहिनूर या संस्थेचे संचालक प्रशांत गायकी यांनी मुलांना मार्गदर्शन केले
  या कार्यक्रमात वाटप करण्यात आलेले पुस्तके बाल शिक्षण ले पुरूषोत्तम खेडेकर खरा शिक्षक दिन 28 नोव्हेंबर ले श्रीमंत कोकाटे शिवपुत्र छत्रपती शंभुराजे ले शैलेश मोडक गाडगे बाबा भाऊसाहेब व बाबासाहेब ले अशोक राणा आदी महापुरुषांच्या विचारांचे 250 पुस्तके मान्यवरांच्या हस्ते पुस्तके वाटप करण्यात आले या उपक्रमातुन विद्याथ्र्याना महापुरुषांचे विचार कळावे व एक सक्षम युवा पिढी घडावी हा संदेश देण्यात आला या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन महात्मा फुले जयंती उत्सव समिती अकोट चे मयूर निमकर निखिल पिंपळे रोहीत शेगोकार अक्षय चोरे अभिलाष काळमेघ रोशन मेतकर प्रशांत बन्नाडे विपुल गुलाये केशव हेन मंगेश चोरे हर्षल खासबागे सिमत पवार वैभव डांगरे रितेश गोरडे विकास रोही वैभव येऊल ज्ञानेश्वर काळे मनीष उपासे यांनी केले होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post