स्मृतिशेष उ.रा.गिरी गझल पुरस्कार



मुर्तिजापूर :- गझलदीप प्रतिष्ठान,मुर्तिजापूर च्या वतीने *स्मृतिशेष उ.रा.गिरी गझल पुरस्कार* यावर्षीपासून  देण्याचे घोषित करण्यात येत आहे.रोख रक्कम 3000 रू.,सन्मानपत्र ,शाल व पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप राहणार असून गझलदीप प्रतिष्ठान तर्फे आयोजित कार्यक्रमात सन्मानपुर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.तरी सन्माननीय गझलकारांनी  दि.1 जानेवारी 2017 ते दि.31डिसेंबर 2017 या कालावधीत आपल्या प्रकाशित झालेल्या गझलसंग्रहाच्या दोन प्रती, आपला पुर्ण परिचय,दोन पासपोर्ट फोटो दि.10 मार्च 2018 पर्यंत संदीप वाकोडे, मु.पो.सिरसो ता.मुर्तिजापूर जि.अकोला पिनकोड -444107 (फोन न.9527447529) या पत्त्यावर  पाठवावे. जाणकार व वरिष्ठ गझलकारांचा समावेश असलेली  निवड समिती या पुरस्कारासाठी  गझलसंग्रहाची निवड करील व त्यांचा निर्णय अंतिम राहील.ज्यांच्या नावाने हा पुरस्कार सुरू करण्यात येत आहे त्या स्मृतिशेष उ.रा.गिरी यांच्या अप्रतिम गझलांनी मराठी गझल समृद्ध झाली आहे.त्यांचे हे कार्य कायम स्मरणात रहावे व नवोदीत गझलकारांना प्रेरणा मिळावी याच निरपेक्ष हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.तरी गझलकारांनी या पुरस्कार योजनेत सहभागी होण्याचे आवाहन गझलदीप प्रतिष्ठान मुर्तिजापूर च्या वतीने करण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post